Rohit Pawar On Maratha Reservation: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली आहे. मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची टीका करत आहे.
तर दुसरीकडे जीआरवर युक्तिवाद करायचा असेल तर तुम्ही मला कुठेही बोलवा सगळी माहिती घेऊन मी तुमच्याकडे येतो व मी युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही देखील जो जीआर काढलेला आहे तो कसा टिकणार तसेच सर्व समाजाला कशा पद्धतीने तुम्ही न्याय दिला आणि उद्या जाऊन जर यावर कोर्टात चॅलेंज झाला तर आरक्षणाच्या जीआर ला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारला आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे महायुतीने जर एखादा जीआर काढला असेल तर त्याला पाठिंबा सर्व मित्र पक्षांनी द्यायला पाहिजे सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे मात्र सध्या मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भाचे क्रेडिट घेण्यासाठी दुसऱ्या मित्र पक्षाला विश्वासात घेता येत नाही घेता येत हे आम्हाला सांगता येणार नाही अशा शब्दात एक प्रकारे रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये असलेले नाराजी नाट्य ही चव्हाट्यावर आणली.
तसेच पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले मराठा आरक्षणाचे उपस्थितीमध्ये अनेक इतर मंत्री देखील होते तसेच महाजन हे देखील ओबीसीचे नेते त्या ठिकाणी होते ज्यावेळेस जरांगे यांचे उपोषण सोडण्यात आले त्यावेळेस ओबीसीचे जयकुमार गोरे हे देखील मंचावर उपस्थित होते तर मराठा नेते ओबीसी नेते हे एकत्र बसून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जीआर काढला असेल यावर कोणीही आक्षेप घेतला नसेल तर लोकांचेही असे मत झाले असेल सर्व मान्य हा जीआर आहे हे सगळं असं असताना काही मंत्री काही नेते नाराजी व्यक्त करत असतील तर याला काय म्हणायचे असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटलेलाच ठेवायचा म्हणून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद हा झाला पाहिजे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे मात्र इतिहास बरोबर इतर प्रश्न देखील दुर्लक्षित होतात. एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होत आहे लोकांचे हाल होत आहे आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही या मूलभूत विषयांवरती चर्चा करायला सरकार उत्सुक नाही सत्ताधाऱ्यांना केवळ ओबीसीविरुद्ध मराठावाद हाच महत्त्वाचा वाटतोय. मराठी अमराठी व्हेज नॉनव्हेज हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रश्नांमध्येच नागरिकांना गुंतवून ठेवून मूलभूत प्रश्नांना फाटा देण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.