Dnamarathi.com

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी आंदोलन सूरू झाले आहे.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार आज नगर शहरातील विविध भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शहरातील एमआयडीसी परिसरातील बायपास चौकात मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला. 

 यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गोरख दळवी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.

 एकदिवशीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा केसानी गळा कापला आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केले नाही. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची फसवणूक करत आहे, अशी प्रतिक्रिया गोरख दळवी यांनी DNA मराठीशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *