Chhagan Bhujbal : जरांगे म्हणतात मराठा समाज मागास नाही पण सुप्रीम कोर्ट म्हणाले मराठा कुणबी एकच मानने सामाजिक मूर्खपणा आहे अशी टीका राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून वातावरण तापले असून मनोज जरांगे ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर टीका करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका घेतली आहे.
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे म्हणतात मराठा समाज मागास नाही पण सुप्रीम कोर्ट म्हणाले मराठा कुणबी एकच मानने सामाजिक मूर्खपणा आहे.
ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरी वाटेकरी नको. 50% च्या आतील आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागास वर्गासाठी आहे. ओबीसीतून आरक्षण देणे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही. असं म्हणत जर आमच्यावर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.