Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे.
काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.