Dnamarathi.com

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. 

अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. 

सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.

 या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली.

असा असणार रॅलीचा मार्ग 

12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *