Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.