DNA मराठी

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत

job

Maharashtra Police: नोकरीच्या पदावर कायम राहताना, महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ (फुलटाईम) शिक्षण घेतल्याचे खोटे दाखले सादर करून पदोन्नती व वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर रोखली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरलं झाला असून कर्मचाऱ्यांना थेट इशारा देणारा ठरला आहे.

व्हायरल झालेला वाहतूक विभागाच्या परिपत्रका नुसार , चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध पदांवरील काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता मिळवताना नियम धाब्यावर बसवले.

नियमानुसार, पूर्णवेळ शिक्षण घेण्यासाठी नोकरीवरून सुटी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी नोकरी करतानाच फुलटाईम पदवी घेतल्याचे दाखवून लाभ मिळवला.

आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नियुक्ती प्रक्रियेनंतर घेतलेली पदवी नियमबाह्य पद्धतीने मिळवलेली असल्यास ती वैध मानली जाणार नाही. तसेच अशा शिक्षणावर आधारित पदोन्नती, वेतनवाढ किंवा अन्य लाभ तत्काळ रद्द केले जातील.

अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, संशयास्पद प्रमाणपत्रांसह पदोन्नतीसाठी अर्ज आले तर त्यांची काटेकोर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी.

यामुळे बनावट शैक्षणिक दाखल्यांच्या बळावर गोडीगुलाबीने पदोन्नती मिळवणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, ‘कोणाच्या गळ्यात कारवाईची घंटा वाजणार?’ हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *