DNA मराठी

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत कारवाई विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त् केला आहे.

 पोलीस अधिक्षक  राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे  विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी इसम हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती. 

पो.नि किरण शिंदे , यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितल्याने लागलीच पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा इसम  शैलेंद्र सुखदेव बोरगे (वय-52 वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर) यास सुझुकी कंपनीची कारसह ताब्यात घेतले.

आरोपीकडून 5,00,000 रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कार व 2,75,460 रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण 7,75,460 रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

 पोकों संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा  दारुबंदी का.क.65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *