शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )
Maharashtra News: अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील कांबी येथील जयश्री दत्तात्रेय काटमोरे वय 33 वर्षे यांच्या घराच्या व शेतीच्या शेजारी भाऊसाहेब मारुती घोलप व ईश्वर भाऊसाहेब घोलप हे कुटुंबासह राहत असून दोघांचाही घराच्या शेजारील बांध एकच असल्याने घोलप हे वारंवार बांध कोरत होते.
माझे पती घरी नसताना मी त्यांना सांगितले की, बांध कोरु नका असे सांगितल्याचा राग आल्याने भाऊसाहेब घोलप व ईश्वर घोलप यांनी मला दगड फेकून मारले व लोखंडी पाईप माझ्या डोक्यात मारून मला जखमी केले असून माझे पती सोडवण्यास आले असता त्यांना देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
शेवगाव पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हालाच मारहाण करून देखील शेवगाव पोलिसांनी घोलप यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप जयश्री काटमोरे यांनी करून पोलिसांच्या विरोधात येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेवगाव पोलीस स्टेशन समोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे जयश्री दत्तात्रेय काटमोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.