Dnamarathi.com

Maharashtra Election: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवार घोषणा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. नुकतंच भाजपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये भाजपने पुन्हा एकदा शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र दुसरीकडे या मतदारसंघातून आता गोकुळ दौंड अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आमदार मोनिका राजळे यांना निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे.

शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात असल्याचा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला आहे.

काही दिवसापूर्वी दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वाशीत केले आहे.

या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती. आ. मोनिक राजळे या 2014 आणि 2019 ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे.

मतदार संघ समस्यांनी ग्रासला
शेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे देखील दौंड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *