Dnamarathi.com

Maharashtra Election: राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पूर्ण झाली असून आता यावेळी राज्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा महायुतीची सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान पूर्ण झाले होते मात्र बहुतांश ठिकाणी 6 नंतर ही मतदाप्रक्रिया सुरू असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होणार हे देखील पहावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये 73.68 तर मुबई शहरमध्ये 52.07 टक्के मतदान झाला आहे.

Maharashtra Exit Polls 2024 :
इलेकोट्ल एज : महायुती – 121, मविआ- 150, अपक्ष – 20

पोल डायरी : महायुती- 122-176, मविआ – 69-121, इतर 12-19

चाणक्य स्ट्रॅटजीस : महायुती -152-160, मविआ – 130-138, इतर- 6-8

मॅट्रिझ : महायुती 150-170, मविआ -110-130, अन्य 8-10

पीपल्स पल्स : महायुती 175-195, मविआ-85-12, अपक्ष-7-12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *