Dnamarathi.com

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. त्यामुळे संदीप कोतकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा नगरच्या राजकारणात होत आहे.

संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात मोठा जल्लोष करण्यात आला.

माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती.

विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे.

कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संदीप कोतकर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *