Dnamarathi.com

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *