LIC Scheme : एलआयसी प्रत्येक श्रेणीसाठी पॉलिसी ऑफर करते. LIC कडे सध्या एक मुलींसाठी योजना आहे. या योजनेमुळे मुलीचे भविष्य सुधारेल. त्यामुळे पालक आता या योजनेत पैसे गुंतवून मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च करू शकतात. विशेष म्हणजे योजना गुंतवणूक जोखीममुक्त आहे.
कन्यादान पॉलिसी
एलआयसीची ही कन्यादान पॉलिसी आहे. या पॉलिसी अंतर्गत, प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरता येईल. तुम्ही 25 वर्षांचा टर्म प्लॅन निवडला तर तुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागणार आहे. ही योजना 25 वर्षांनी परिपक्व होते, कारण या पॉलिसी अंतर्गत मुदत योजना 13-25 वर्षांसाठी असून हे लक्षात घ्या की मुदतपूर्तीच्या वेळी, संपूर्ण रक्कम विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनससह दिली जाते. ही पॉलिसी घेण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे,हे लक्षात घ्या.
मिळेल कर्जाचा लाभ
तुम्ही ही पॉलिसी विकत घेतली तर तुम्ही तिसऱ्या वर्षापासून कर्ज घेऊ शकता. समजा तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असल्यास ही सुविधा पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षांनी दिली जाते. या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिलेल.
मिळेल कर सवलती
ही पॉलिसी घेतली तर करमुक्तीचा लाभ मिळतो. प्रीमियम जमा केला तर एखाद्याला कलम 80C अंतर्गत कपातीचा लाभ मिळतो आणि कलम 10D अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त असून पॉलिसीसाठी विमा रकमेची मर्यादा किमान 1 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही.
असा मिळेल लाखोंचा लाभ
समजा या पॉलिसी अंतर्गत 25 वर्षांचा टर्म प्लॅन घेतला आणि 41,367 रुपये वार्षिक प्रीमियम भरला. मासिक गणना केली तर प्रीमियम सुमारे 3,445 रुपये भरावा लागेल. तुम्हाला 22 वर्षांसाठी हा प्रीमियम भरावा लागणार आहे. ते 25 वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करेल.
वडिलांचा मृत्यू झाला तर पुढील प्रीमियम भरावा लागणार नाही. याशिवाय 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. 25 व्या वर्षी एकरकमी परिपक्वता रक्कम दिली जाईल. वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर नॉमिनीला इतर सर्व मृत्यू लाभांसह 10 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू लाभ देण्यात येतो.