DNA मराठी

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.

आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *