DNA मराठी

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;

पत्रकारास शिवीगाळ,

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी
तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करणार

अहिल्यानगर – शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक फौजदार टाईम्स चे कार्यकारी संपादक अन्सार राजू सय्यद (वय 51, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना कार्यालयीन आवारात शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बलभिम सानप या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून कलम 351(2), 352 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.

घटनेची पार्श्वभूमी
फिर्यादी अन्सार सय्यद हे राज चेंबर्स, कोठला येथे असलेल्या आपल्या कार्यालयात नियमित हजेरी लावतात. त्यांच्या कार्यालयासमोरच आरोपी बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास फिर्यादींचा ओळखीचा गणेश उरमुले हा कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आला होता. भेटीच्या दरम्यान उरमुले यांनी इमारतीतील शौचालय वापरले.

यानंतर सानप यांनी उरमुले यांना बोलावून “तू लघवी केली आहेस, टॉयलेट धुवून घे” असे सांगितले. उरमुले हे पाणी घेऊन टॉयलेट धुण्यास जात असताना सानप यांनी पुन्हा हाक मारून “तू लघवीला तिकडे का गेला?” असे विचारत चापटी मारून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

पत्रकार व मुलाला देखील धमकी
ही घटना फिर्यादींनी कार्यालयातून पाहिली व त्यांनी सानप यांना ओरडले की, उरमुले टॉयलेट धुवून देतील, मारू नका. यावेळी फिर्यादींचा मुलगा अमन सय्यद हा देखील तिथे गेला व दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविला.

यानंतर, पार्किंगमध्ये असताना सानप यांनी अन्सार सय्यद यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्का बुक्की केली, “तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झाला का? तुमची लायकी काय आहे मला माहित आहे,  मी चांगल्या-चांगल्यांना कामाला लावले आहे, आता पुढचा नंबर तुझा” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे.

या प्रकरणी तोपखाना पोलीस्थाण्य्त गुन्हा दाखल,
फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा क्र. 832/2025 दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्याकडे दिला आहे. गुन्हा बीएनएस 351(2) व 352 या कलमांखाली नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून रोजनाम्यात नोंद केली आहे.

या घटनेने पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पत्रकार संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *