DNA मराठी

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या रागावरून गोळीबार करण्यात आल्याची बातमी मिळाली आहे. 

 या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले. 

गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत. 

 बाबुलाल पठाण  हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे  हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.

 याचाच मनात राग धरून 3 मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले.

यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *