BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे.
संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले.
काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.






