DNA मराठी

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम

Sanjay Gaikwad : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तत्वानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काल रात्री बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना  मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे. 

यावेळी ते म्हणाले की, स्टेटमेंट मी केले, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेसने केले. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलीय. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील असं ते म्हणाले. 

तर माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे. असेही या वेळी ते म्हणाले.

 तसेच आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. असेही संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *