Dnamarathi.com

Hingoli News: मागील तीन दिवसापासून रामलीला मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी चषक 2023 च्या अंतिम सामन्यात बी. सी. फाउंडेशन (पुणे) आणि सतेज क्रीडा मंडळ (पुणे) या दोन संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात पुण्यातील सतेज क्रीडा मंडळ  या संघाने बाजी मारली. 

त्यामुळे वसुंधरा फाउंडेशन तर्फे आयोजित तिसऱ्या कबड्डी चषक 2023 चषकाचा मानकरी संघ सतेज क्रीडा मंडळ हा ठरला. या संघाला दोन लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

मागील तीन दिवसापासून हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सतेज क्रीडा मंडळने पुण्यातीलच डी. सी. फाउंडेशनचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना टक्कर दिली.

 परंतु, शेवटच्या क्षणी सतेज क्रीडा मंडळाने एक पल्ला मारत विजय मिळवला. या विजयाबद्दल सतेज क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आणि खेळाडू खूप उत्साहित आहेत. त्यांनी या विजयाचे श्रेय आपल्या संघाच्या कठोर मेहनतीला दिले.

सतेज क्रीडा मंडळाच्या या विजयामुळे महाराष्ट्रातील कबड्डीच्या चाहत्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. या विजयामुळे महाराष्ट्रातील कबड्डीचा पुढचा भविष्य उज्ज्वल दिसत आहे, असे मत वसुंधरा फाऊंडेशन च्या अध्यक्षा मनीषा काटकर यांनी व्यक्त केले. 

स्पर्धेचे निकाल

प्रथम क्रमांक: सतेज क्रीडा मंडळ (पुणे) 

द्वितीय क्रमांक: बी. सी. फाउंडेशन (पुणे) 

तिसरा क्रमांक: शिवमुद्रा क्रीडा मंडळ, कोल्हापूर 

चौथा क्रमांक: मिड लाईन संघ , रायगड 

स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई: धीरज बैलमारे, मिड लाईन, रायगड

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड: वैभव राकडे, शिवमुद्रा संघ, कोल्हापूर

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू: अक्षय सूर्यवंशी, डी. सी. फाउंडेशन, पुणे 

कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोविंद डिके – पाटील, नीलेश तिडके, नीलेश नाथ, दिनेश मंगिराज, अक्षय झायले, राहुल सोनवणे, गजानन काळेवर, जगन्नाथ भगत, जगदीश खंदारे, विशाल शिंदे आणि स्वप्नील बदक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *