Vijay Wadettiwar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून राजकारण तापले आहे. यातच राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्याने आता ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
तर दुसरीकडे जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना फोन केला, साधारण 150 ओबीसी नेते उपस्थित राहतील, पक्षाचा पलीकडे जाऊन बैठक बोलावली आहे.ओबीसी हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वाना येण्याची विनंती केली. सरकारने जीआर काढला त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. पात्र शब्द पाहिले प्रमाणे ठेवला असता तर आम्हाला विरोध नव्हता, मराठा समाजाला काय द्यायांच आहे ते सरकारने द्यावे. त्याला आमचा विरोध नाही, सर्व भागातील मराठा समाज ओबीसीत येणार आहे.
राहुल गांधींनी जी भूमिका आरक्षण मर्यादा 50 टक्क्यावर नेऊन, जात निहाय जंनगणना करून सर्वाना त्यांचा प्रमाणे आरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बबनराव तायवाडे यांची भूमिका पूर्वी होती ती आता दिसत नाही, ते कुठल्या चष्म्यातून बघतात ते त्यांना माहित नाही. पुढे येणाऱ्या दिवसात सत्य परिस्थिती लक्षात येईल, तायवाडे यांची भूमिका स्पष्ट नाही. छगन भुजबळ, हाके यांना निरोप दिला आहे, भुजबळ यांच्याशी मी स्वतः संपर्क केला. पण, माझा संपर्क झाला नाही. ऑफिसचा संपर्क झाला असेल. भुजबळ यांच्या मताशी आम्ही भूमिकेशी सहमत आहे.ओबीसीच नुकसान होत आहे. असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.