DNA मराठी

Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवारांना सर्वांची नावे तोंडपाठ; फक्त ‘त्या’ दोघांची नावे पवार विसरले; गोपीचंद पडळकरांचा टोला

gopichand padalkar on sharad pawar

Gopichand Padalkar on Sharad Pawar: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी मतचोरी केल्याचा आरोप केला आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणून देतो अशी ऑफर दोन जणांनी दिली होती असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला होता. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावे माहीत असतात. पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असे भेटून सांगितले होते असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची फक्त नावे पवार विसरलेत. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावे माहीत असतात. पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असे भेटून सांगितले होते असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची फक्त नावे पवार विसरलेत.

बाकी सर्वांची नावे शरद पवारांना आठवतात असे म्हणत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरानी टोला लगावलाय.

एका कार्यक्रमात आयोजकांचे कौतुक करताना पडळकर यांनी हे शरद पवारांवर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *