Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.
विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.