Dnamarathi.com

Ahmednagar News: जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत यावे असे आवाहन अहिल्यानगरचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे. ते नगर येथील प्रचार सभेत बोलत होते. नगर जिल्ह्यात मागील १५ वर्षापासून प्रलंबित असेलेला उड्डाणपुलाचा विषय खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट असून त्यांच्या माध्यमातूनच जिल्हा विकसित होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी लोकांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. नगर मध्ये प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांचासह अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपूते, भैया गंधे, बाळासाहेब वाकडे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, उदय कारळे, करण कराळे, मा. नगरसेविका शिंदे, संपत नलावडे, बाळासाबेह गायकवाड, नितीन शेलार, अशोक गायकवाड, प्रिया जानवे, सविता कोटा व इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी नागरिकांना संबोधित करताना आगरकर म्हणाले की, विखे पाटील कुटुंबांची नाळ जिल्ह्याशी जोडली आहे. मागील ५० वर्षाच्या काळात विखे पाटील कुटुंबांनी जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. यामुळे त्यांच्या चौथ्या पिढीला लोकांनी साथ मिळत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे तरूण असून उच्च शिक्षित आहेत. त्याच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार आहे. मागील पाच वर्षात त्यांच्या मार्फत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभे राहिले, तरूणांना रोजगार मिळावा म्हणुन तीन एमआयडीसीची मुहुर्तमेढ रोवली आहे. बचत गटांच्या मार्फत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना सहकार्य केले आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवुन देण्याचे काम त्यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यात विकास हवा असेल तर खा. सुजय विखे पाटील हे सर्वोत्तम प्रर्याय आहेत. असे आगरकर म्हणाले.

लोकांनी मतदान करताना आपला नेता कसा असावा याचा विचार करावा, जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणासाठी विखे परिवार ओळखला जातो. आणि सुजय विखे हे केवळ आपल्या विकास कामाच्या जोरावर मतदान मागत आहेत.  

देशामध्ये गेल्या १० वर्षामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर खा. सुयज विखे पाटील यांना मतदान केले पाहिजेत. आपल्याला जो मताचा संविधानिक अधिकार मिळाला आहे  त्याचा योग्य वापर करा.  आणि राष्ट्रहीताचा वापर करणाऱ्या सरकारच्या मागे उभे रहा असे आवाहन अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *