Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून आचारसाहित लागू करण्यात आली असून महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर असून उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे.
उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 असणार आहे. तर उमेदवारांना 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून राज्यातील 29 महापालिकांचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – 23 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – 2 जानेवारी 2026
उमेदवारांना चिन्ह वाटप – 3 जानेवारी 2026
मतदान – 15 जानेवारी 2026
मतमोजणी – 16 जानेवारी 2026






