Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्याची माहिती दिली आहे. तसेच रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड देखील आकारला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर ट्रम्प यांनी माहिती दिली आहे.
भारत आणि अमेरिकेतील व्यापार गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी आहे कारण भारताचे टॅरिफ दर खूप जास्त आहेत आणि तेथील गैर-मौद्रिक व्यापार अडथळे देखील खूप गुंतागुंतीचे आणि आक्षेपार्ह आहेत. असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करत आहे, ज्यामुळे युक्रेन युद्धाविरुद्ध अमेरिकेची मोहीम कमकुवत होते. असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त दंड भरावा लागणार
भारत आता 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ भरेल आणि अतिरिक्त दंड देखील भरावा लागेल, जो रशियासोबतच्या संबंधांची किंमत असेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी लिहिले की भारत त्याच्या लष्करी गरजांसाठी रशियावर दीर्घकाळ अवलंबून आहे आणि सध्या तो रशियाकडून ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. ते रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे खरेदी करत आहेत आणि चीनसह ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा संपूर्ण जगाला रशियाने युक्रेनमध्ये हत्या थांबवावी असे वाटते, तेव्हा या सर्व गोष्टी चांगल्या नाहीत.