Rohit Pawar : ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदार संघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.
हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही तो कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मतदान केलं आहे का? असं न पाहता मुला मुलींचा अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी 14000 सायकलीचा वाटप करण्यात आले अशी प्रतिक्रिया आमदार रोहीत पवार यांनी दिली. अजून दोन टप्प्यात हे सायकल वाटप केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांच्या मतदार संघात धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले.
सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे
कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे.
दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे अशा प्रकारचा कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.