“अजित पवार यांच्या गटात आले, तर मनापासून स्वागत” — संग्राम जगताप
अहिल्यानगर | प्रतिनिधी – जयंत पाटील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. यावर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप sangrm Jagtap यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
“जयंत पाटील Jayant Patil, यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या भेटींमुळेही अनेक शक्यता पुढे आल्या. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, मात्र त्यांच्यातील अस्वस्थता कायम राहिली,” असं जगताप यांनी सांगितलं.
“माजी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते, परंतु सरकार पडल्यानंतर त्यांच्या भोवतीच्या चर्चांना वेग आला. आज त्यांनी स्वतःहून राजीनामा सादर केला, यावरून या चर्चांमध्ये काही तथ्य होतं, हे स्पष्ट होतं,” असं मत जगताप यांनी व्यक्त केलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “जर जयंतदादा अजित पवार aajit pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील, तर आम्ही सर्वजण त्यांचं मन:पूर्वक स्वागत करू. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि राज्याला निश्चितच फायदा होईल,” असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
जयंत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.