Dnamarathi.com

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.

   बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे. 

या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *