DNA मराठी

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे.

यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली.

मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले.

तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. 

तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *