Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे.
या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.