Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. मात्र सरकार स्थापन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे राजकीय चर्चानुसार महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फार्मूला देखील ठरला आहे. या फॉर्मुलेनुसार भाजपला 20 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह गृहविभाग मिळावा यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप देखील गृह विभाग सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ विभाग जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
जर शिवसेनेला गृह विभाग मिळाला नाही तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसल्याची चर्चा देखील होत आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे किंवा गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.