Dams Water Storage: येणाऱ्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
समोर आलेल्या आकडेवारीवरून राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. या भागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे.औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 37 टक्के पाणीसाठा आहे.
माहितीसाठी जाणुन घ्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील धरणांमधील पाणीसाठा वाढल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी आजपर्यंत राज्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा 64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अपुरा पाऊस हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यावर जलसंकटाचा धोका निर्माण झाला आहे.
कुठे किती पाणी शिल्लक आहे?
अहवालानुसार, कोकण विभागातील जलाशयांमध्ये सर्वाधिक पाणी शिल्लक आहे. कोकणातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर औरंगाबादच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
पुणे विभागातील धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक विभागातील धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
अमरावती विभागातील धरणांमध्ये 74 टक्के तर नागपूर विभागातील धरणांमध्ये 69 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचवेळी कोकण विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 37 टक्के पाणीसाठा आहे.
राज्यात कुठे कुठे पाऊस झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण पाऊस सरासरीपेक्षा 13.4 टक्के कमी झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून अधिकृतपणे 1 जूनपासून सुरू होतो आणि साधारणपणे 30 सप्टेंबरपर्यंत टिकतो. राज्यातील किमान 9 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे.
मात्र, कोकण-गोवा पट्ट्यात सरासरीपेक्षा 18 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला, तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला. विदर्भात सरासरीपेक्षा दोन टक्के कमी पाऊस झाला आहे.