DNA मराठी

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले

chandrashekhar bawankule on ajit pawar

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने गेल्या सात वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांच्या या गंभीर आरोपामुळे आता महायुती मधील घटक पक्ष भाजप देखील आक्रमक झाला असून अजित पवारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांच्या अडचणीत वाढ होईल असं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजितदादांनी जे मानलं खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपवर टीकाटिपणी केली आहे, भारतीय जनता पार्टी बद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की मित्र पक्षाचे मनभेद आणि मतभेद होणार नाहीत, अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला हव्या होत्या,परंतु जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाळलं नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना म्हणाले की,

रवींद्र चव्हाण म्हणाले ती गोष्ट खरी आहे की मित्र पक्षात खडा पडेल असं विधान कोणी करू नये.

जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निवडणूक लढण्यासाठी काहीही व्हिजन नसतं, तेव्हा लोक निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा भावनात्मक करून मतं घेण्याचा प्रयत्न करतात असं बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे विकास काम करू शकत नाही

तसेच त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जाहीरमान्यावर देखील भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनाची व केलेला जाहीरनामा काहीच पूर्ण करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची काम केली, ते उद्धव ठाकरे करू शकत नाही असेही ते म्हणाले.

मुंबईला सर्व जगातलं सुविधायुक्त शहर, भारतातला सर्वात विकसित शहर, मुंबईचा व्हिजन 2047 चा मॅप देवेंद्रजींनी केला आहे . उद्धव ठाकरे यांच्या कार्यकेळाचा अभ्यास जर केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, किती खोटारड्या घोषणा केल्या त्या लोकांना माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेला जाहीरनामा किंवा दिलेली आश्वासन, काहीच पूर्ण करणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *