DNA मराठी

राजकीय

Maharashtra Politics: …म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

Maharashtra Politics:  देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी केले. यामुळे देशात मोदींजी आणि जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील हेच योग्य नेतृत्व करू शकतील असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.    प्रियाताई जानवे यांनी यावेळी विरोधी उमेदवाराचा चांगला समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, आमदार असताना विरोधी उमेदवाराने महिलांना कशा प्रकारे त्रास दिला हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मोठ्या पदावर असतानाही त्या महिलांचे खच्चीकरण करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला. यांची आपल्या सर्वांना माहिती आहे. जर अशी व्यक्ती सत्तेत आली तर महिलांना रस्त्यावरून फिरणे अशक्य होणार आहे.यामुळे अशा विचारसरणीचा माणुस राजकारणात नाही तर समाजात असणे गरजेचे नाही यामुळे अशा वृत्तींना मतदारांनी हाणून पाडले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.  तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना पीठ गिरणी, शेती अवजारे, पॅकिंग मशीन आदी वस्तूंच्या माध्यामातून स्वयंरोजगार देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रधानमंत्री मातृयोजनेच्या मार्फत दीड लाखाहून अधिक महिलांचे मातृत्व सुरक्षित आणि सुखद केले. तर उज्वला योजनेच्या माध्यमातून तीन लाखाहुन अधिक महिलांचे आरोग्य सुरक्षित केले. अशा विविध योजनाच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे हे सच्चा भाऊ म्हणून महिलांच्या मागे उभे राहिले आहेत. यामुळे आपल्या पाठीराख्याला विजयी करणे हे नगर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेचे आद्य कर्तव्य राहणार आहे. येत्या १३ मे रोजी डॉ. सुजय विखे मोठ्या मदाधिक्याने मतदान करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले. 

Maharashtra Politics: …म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे Read More »

Maharashtra News : व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार

Maharashtra News: अहमदनगर मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार सभा, कॉर्नर मिटींग आणि गाठी भेटी देण्यावर भर दिला आहे. याच निमित्ताने ते आज नगर शहरातील कांदा मार्केट मध्ये व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत आमदार संग्राम जगताप, उद्योगपती सचिन कोतकर, अविनाश घुले, निखील वारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी खा. विखे यांनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला की, महायुती सरकार हे व्यापाऱ्याच्या जोडीला आहे. व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक मुलभूत सेवा सुविधांवर सरकारच्या वतीने भर दिला जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपुर लाभ व्यापाऱ्यांना मिळण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.  तसेच नारायन डोह येथील नवीन रेल्वे स्थानकात कांदा व्यापाऱ्यांसाठी रल्वे धक्का निर्माण केला जाईल.त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांना भारतभर कांद्याचा व्यापार करता येईल.विळद येथील नवीन एमआयडीसी मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्यावर प्रकिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभारणी केली जाईल. चिचोंडी पाटील येथे जनावरांचा बाजार उभा करून पशु व्यवसायाला चालणा देण्याचे काम केले जाईल. त्याच कांद्याच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणार अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर सरकार दरबारी असलेले हमाल, मापाडी वर्गाचे विविध प्रश्न प्राथमिकतेच्या जोरावर सोडविले जातील असे ही ते म्हणाले.  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच गरिबांच्या सोबतीला आहेत. हमाल आणि मापाडी, माथाडी कामगार यांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. व्यापारी वर्गासाठी मोदी सराकारने मागील १० वर्षात विविध योजना आणुन त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत.यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. आपले एक मत हे मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग बळकट करण्यासाठी आहे. यासाठी महायुतीच्या बीड मधून पंकजा मुंडे आणि नगर मधून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra News : व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार Read More »

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील

Lok Sabha Election: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या ५ वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ५ वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या ५ वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे महायुतीच्या काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरूणांना कामासाठी बाहेर जावे लागणार नाही यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. त्यासाठी तीन एमआयडीसीची कामे तयार असून लवकरत त्या सुरू केल्या जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी बीयाण्यापासून बाजारपेढापर्यंत सेवा सुविधा निर्माण करण्यासा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान मोदींच्या हमीच्या जोरावर जिल्हा सुभलाम सुफलाम करणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

Sujay Vikhe News:  महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर पाठिंबा दिल्याचे पत्र दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्याच बरोबर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.  महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्याता दलित पॅंथरने पाठिंबा जाहिर केल्याने त्यांचे निवडणुकीतील बळ वाढले असून त्यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.   पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथरच्या रुपाने राज्यात आंबेडकरी विचारांची चळवळ उभी केली. यामुळे फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून जाणाऱ्या महायुती सरकार नक्की प्रयत्न करेल असा आमचा विश्वास आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दलित पॅंथर सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले. दलित पॅंथरच्या या भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना त्याचा मोठा फायदा होईल अशा विश्वास सुद्धा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Sujay Vikhe News: दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा Read More »

Maharashtra News: मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत आहे

Maharashtra News: अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्‍य सरकार हे शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्‍यांमध्‍ये शेतक-यांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्‍या बैठकांमधून त्‍यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्‍या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सर्वसामान्‍य माणसांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. देश आज विविध क्षेत्रात प्रगती करीत असून, देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  राज्‍य सरकारने शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका नेहमीच घेतली. एक रुपयात पीक विमा योजनाचे लाभ तालुक्‍यातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मिळाला. अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना मदत म्‍हणून राज्‍य सरकारने पाच रुपये अनुदानाची योजना सुरु केली. आज जिल्‍ह्यातील बहुसंख्‍य  शेतक-यांच्‍या खात्‍यात अनुदान वर्ग झाले असून, सर्व शेतक-यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळेल.   जिल्‍ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास इच्‍छुक असून, नामवंत कंपन्‍या येणार असल्‍यामुळे तरुणांनाही संधी मिळेल. यापुर्वी धाक दडपशाहीमुळे चांगले उद्योग जिल्‍ह्यातून निघुन गेले. ही परिस्थिती आपल्‍याला बदलायची असेल तर, उद्योजकांच्‍या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल. देशात पुन्‍हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वामध्‍ये सरकार येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या  विकासाला चांगले पाठबळ मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Maharashtra News: मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत आहे Read More »

Sujay Vikhe: ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe: देशात सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकातील कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा सडकून समाचार घेत विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला फक्त खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, सदरची निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे हे जनतेला ठरवायचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाला विकासासाच्या माध्यमातून जगात महासत्ता म्हणून पुढे आणायचे आहे. २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले.

Sujay Vikhe: ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे Read More »

Maharashtra News: सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10  वर्षे : खा. डॉ. सुजय विखे

Maharashtra News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापुर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे होय. या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे पं. मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरवात केली ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते.   नगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असुन महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आम. मोनिका राजळे,  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.  या वेळी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविला आहे. गरीब कल्याण योजनेच्या माध्यामातून ८० कोटी हून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ५० कोटी हून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३४ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यामातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. ४ कोटी हुन अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यातून पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. तर १४ कोटी हून अधिक लोकांना जल जीवन मिशनच्या रुपाने शुद्ध पाणी मिळाले आहे. मागील १० वर्षात २५ कोटीहून अधिक लोक गरीबीतून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. देशात मोदींची हमी बोलत आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुण येणार यात आता कोणतीही शंका उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगर जिल्ह्यातही मोदी सरकारच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात निधी  उपलब्ध झाला असून अनेक विकासकामे झाली असल्याने नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचा विश्वास खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Maharashtra News: सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10  वर्षे : खा. डॉ. सुजय विखे Read More »

Lok Sabha Election:  डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा

Lok Sabha Election :  डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व  कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.  राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरसेवक विक्रम भुजाडी, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक रविंद्र म्हसे, कामगार नेते कारभारी खुळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, आम्ही कधीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात राजकारण केले नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमी कारखान्याला मदत व सहकार्य करण्याचे काम केले. कै. रामदास पाटील धुमाळ यांच्या काळात देखील बँकेची मदत मिळवून दिली होती. संस्था टिकली पाहिजे, कामधेनू जगली पाहिजे, ऊस उत्पादक सभासद व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेण्याचे काम केले. सभासदांनी निवडणुकीत निवडणूक दिलेल्या पॅनलला मदत करण्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार संचालक मंडळास मदत केली.  कर्जाचे पुनर्गठन करून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना सुरू केला. कारखाना बंद कसा पडला, सुरू कोणी केला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. काही दिवसांपूर्वी कामगारांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रश्नासाठी भूमिका घेतली यामध्ये खा.डॉ. सुजय विखे पाटील व आम्हाला काही चूक वाटत नाही. चार वेळा बँकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम झाले. परंतु यामध्ये कामगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही अशी अट घातली होती. त्यामुळे कोणी पुढे आले नाही. मागील वेळी कामगारांनी आंदोलन केले त्यावेळी सुमारे ८.५० कोटी रुपये फंडाची रक्कम आपण बँकेच्या टॅगिंग मधून मिळवून देण्याचे काम केले.  यापुढे देखील कारखाना सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. तसेच कामगारांचे देणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भूमिका मांडताच उपस्थित सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला. प्रास्तविक करताना युनियनचे सचिव सचिन काळे यांनी सांगितले की, कारखान्याचे कामगार कारखाना गेटच्या आतमध्ये कोणतेही राजकारण करत नाही. मागील निवडणुकीत आम्ही सर्व कामगारांनी एकमताने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला होता. आम्हाला राजकारण करायचे नाही आमची रोजी रोटी महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे देणे मिळाले पाहिजे आम्ही सर्व कामगार यावेळी देखील खा. डॉ.सुजय विखे यांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग यांनी सांगितले की, डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील व शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून नेहमीच आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. कामगारांनी मागील वेळी आंदोलन केले त्यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने आम्हाला फंडाचे पैसे मिळू शकले. आता देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कारखाना चालवावा आम्ही सोबत असून आम्ही सर्व कामगार खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा देतो असे सांगितले.  कारभारी खुळे यांनी सांगितले की, सेवा निवृत्त कामगारांचे देणे अद्याप मिळालेले नाही यासाठी प्रयत्न करावा. सर्व कामगार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे सांगितले. यावेळी बहुसंख्य कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Lok Sabha Election:  डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा Read More »

Ahmednagar News: माझे विकासाचे व्हिजन क्लिअर आहे… डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:  जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, त्यासाठी माझा आरखडा तयार असून त्यात शेतकरी, गरीब- गरजू पासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केले आहे. यामुळे येत्या पाच वर्षात अहिल्यानगरचा विकास हा सर्वासाठी एक उदारण राहणार आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार असून देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याचा विकास कुणी रोखू शकणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.  पाथर्डी जिरेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, राज्याच्या उत्पनात अहिल्यानगरचा वाटा महत्वाचा आहे. जिल्ह्यात सर्विस सेक्टर बरोबर शेतीला सुद्धा मोठा वाव आहे. कृषी-संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगाराची उच्च क्षमता जिल्ह्यात असल्याचे त्यांनी  सुजय विखे यांनी सांगितले. म्हणुन कृषी-प्रक्रिया, अन्न उत्पादन आणि कृषी-पर्यटन अशा कृषी-संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे. यामुळे जिल्ह्यात एमआयडीसीच्या माध्यमातून देशी परदेशी गुंतवणुक आणुन जिल्ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढली जाईल यावर भर देणार. त्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे.   शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मीती केली जाईल. तर पशु पालन व्यवसायाला चालणा दिली जाणार आहे. शेळी- मेंढी पालणातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जातील. त्याच बरोबर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे. त्यातून सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातील. तसेच ट्रेडींग,रिपेरिंग, हॉटेल, अशा व्यवसायांना अनुकुल वातारण निर्माण केले जाईल. असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.  यामुळे माझे विकासाचे व्हिजन क्लिअर असून केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असल्याने आपल्या जिल्ह्याचा कुणीच विकास रोखू शकणार नाही. यामुळे देशाच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मला मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी सभेला आम. मोनिका राजळे,  राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ahmednagar News: माझे विकासाचे व्हिजन क्लिअर आहे… डॉ. सुजय विखे Read More »

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sujay Vikhe News: महाराष्ट्र मजबूत  झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते बोलत होते.    नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्‍यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्‍यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  ततपुर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. प्रभातफेरीपुर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.या रॅलीमध्ये महिला युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीगेट चौकात या रॅलीचा समारोप झाला.  त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिदे म्हणाले की , ड्रामा करून कुणी निवडून येत नाही. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा आहे. स्व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलरावांच्या   आठवणींना उजाळा दिला. त्यांचा  वारसा स्व. बाळासाहेब विखे यांची पुढे नेला,तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला.आणि सुजय विखे हा वारसा अविरत चालवत आहेत. यामुळे सुजय विखे हे सर्वांच्या सुखादुखात धावून जातात. त्यांना तरूणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मोठ्या प्रभावीपणे लोकसभेत मांडले आहेत. यामुळे ज्याच्या नावातच जय आहे त्याचा पराभव अशक्य आहे. डॉ. विखे खासदार झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीप मध्ये सामिल होणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात  इंडी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार ही विकासाची गाडी असून त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचे इंजिन आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीत सर्वच स्वताला इंजिन समजतात. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्याने इंजिनमध्ये केवळ ड्रायवरला बसायला जागा असते. सर्वसामान्यांना इंजिनमध्ये बसता येत नाही.  राहूल सोनिया गाधीच्या इंजिन मध्ये राहूल गांधी बसतील होतील, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील होतील तर उध्दव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील अशी मार्मिक टिका करून दुसरीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आणि इतर मित्र पक्षांचे डबे आहेत. तिथे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मोदींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी १३ मेला मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर खा. डॉ, सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »