DNA मराठी

राजकीय

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Sandeep Kotkar : नगरचे माजी महापौर संदिप कोतकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली खोटी एन.सी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. माजी महापौर संदिप कोतकर केडगाव येथे येऊन केडगांव देवीचे दर्शन घेतले मात्र त्यांच्या विरोधात संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी खोटी माहिती पसरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात आणि इतर २०० लोकांविरोधात एन.सी. दाखल केली मात्र एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल करण्यात आल्याने ही एन.सी. रद्द करण्यात यावी तसेच खोटी एन.सी. दाखल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाली पोलीस स्टेशन येथे खोट्या घटनेची दि. २४/१०/२०२४ रोजी दाखल केलेली एन.सी. रद्द करुन खोटी एन.सी./तक्रार केल्याने संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आम्ही सर्व नागरीक आपणास निवेदन करु इच्छितो की, आम्ही सर्व नगर येथील राहणारे असून नगरचे माजी महापौर  संदिप कोतकर हे नगर येथे आल्यामुळे त्यांचे केडगांव ग्रामस्थ यांनी स्वागत करुन भेट घेतली तसेच त्यानंतर त्यांनी केडगांव देवीचे दर्शन घेऊन ते त्यांचे केडगांव येथील निवास स्थानी निघून गेले. अशाप्रकारे परिस्थिती असताना संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी दुषीत हेतूने प्रेरीत होऊन कुकारस्थान रचण्याचे उद्देशाने खोटी घटना रचून कोतवाली पोलीस स्टेशन येथे ४२ लोक व इतर २०० लोक अशांविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९ (२), १९०, २२३, ३(५), ३५१ (२), ३५२ अन्वये तक्रार / एन.सी. नोंदविली आहे. सदरची तक्रार / एन.सी. ही पुर्णतः खोटी असून तशी कोणतीही घटना घडलेली नाही. सदरची एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सदर तक्रार देणारे तक्रारदार यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉर्डोंग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लागण्यास मदत होईल व साहेबांना सदर प्रकरणाची सत्य परिस्थिती अवगत होईल. एन.सी. दाखल करणारे तक्रारदार हे न्युसेन्सिकल पार्श्वभूमी असलेले व उपद्रवी व्यक्ती असून त्यांना विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. अशा उपद्रवी लोकांमुळे परिसरातील आमचे सारख्या नागरीकांना फार त्रास होत आहे व वारंवार आमचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे वरील नोंदविलेल्या खोट्या एन.सी. व तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी तसेच तक्रारदाराचे मोबाईल कॉल डिटेल्स, रेकॉर्डींग तपासून खोटी एन.सी. दाखल केली म्हणून तक्रारदार व त्याचे बरोबर कटात सामील असलेले संबंधीतांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व सदरची एन.सी. तात्काळ रद्द करण्यात यावी ही साहेबांना नम्र विनंती. सदर तक्रार ही तक्रारदाराने इतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व राजकीय मंडळींना हाताशी धरुन नोंदविल्याचा आम्हाला संशय आहे. असं या निवेदनात म्हटले आहे.

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी Read More »

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात

Congress First Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहे. तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. काँग्रेसकडून पुढील एक-दोन दिवसात आपली दुसरी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात Read More »

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात

NCP Second Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जीशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना नेते वरून सरदेसाई विरुद्ध जीशान सिद्दिकी असा सामना रंगणार आहे. तर पक्षाकडून अनुशक्ती नगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जागी पक्षाने आता त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध इस्लामपूर मधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. तसेच तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील असा सामना रंगणार आहे. वडगाव शेरीमधून पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहमधून भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात Read More »

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 25 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. तत्पूर्वी सकाळी 10.15 वाजता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील. त्यानंतर संविधान चौकात येऊन तेथून सकाळी 10.40 वाजता रॅलीला प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसिल कार्यालयात सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत, तर त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज Read More »

Sanjay Raut On Mahayuti: 25 ओव्हरचा खेळ बाकी, 175 जागांवर विजय मिळवणार, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Sanjay Raut On Mahayuti: महाविकास आघाडीचा जागावाटप अंतिम चर्चेत आले असून आम्ही विधानसभा निवडणुकीत 175 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणार आणि हे आमची बेरीज आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जागावाटपावर आता फार घोळ घालून चालणार नाही.आम्ही 85 पर्यंत आलो आहोत.अजून 25 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सांगोला, पारांडा इथे शिवसेनेचा आमदार जिंकला आहे. त्यामुळे त्या जागांवर परद्यामागे चर्चा होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच जागावाटपावरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद नाही. प्रत्येक पक्ष आघडीमध्ये आपल्या ताकदीनुसार आणि जिंकण्याच्या क्षमतेनुसार जागा मागत असतो त्याला वाद म्हणता येत नाही. आम्ही लवकरच जागावाटपाचा तिढा सोडवणार आहोत. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जागा वाटपावरून विरोधकांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, महायुतीतील सर्व पक्ष दररोज जीलाब्या खायला बसतात का? त्यांच्यात देखील चर्चा सुरू आहे. असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Sanjay Raut On Mahayuti: 25 ओव्हरचा खेळ बाकी, 175 जागांवर विजय मिळवणार, संजय राऊतांचा विरोधकांना टोला Read More »

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा?

MVA Seat Shearing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. जाणून घ्या सीट शेअरिंग फॉर्म्युलाकाँग्रेस 105 जागा, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (शरदचंद्र पवार) 84 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र आतापर्यंत या वृत्ताला कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्याने दुजोरा दिला नाही. उर्वरित जागा महायुतीत समाविष्ट असलेल्या छोट्या पक्षांना दिल्या जातील. शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेला भिडल्यानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राष्ट्रवादीचे (शारदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि नंतर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. थोरात आणि इतर एमव्हीए नेत्यांनी नंतर पुन्हा भेट घेतली. थोरात म्हणाले की, एआयसीसीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पवार आणि ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते.

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा? Read More »

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी  स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी Read More »

Maharashtra Election 2024 : ठाकरेंच्या भेटीनंतर पारनेरमध्ये मोठी घडामोड, पठारे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे. तर दुसरीकडे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केलेल्या असून बैठकांचा धडाकाच लावला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पठारे यांनी वारंवार मातोश्री गाठत ठाकरेंच्या भेठीगाठी घेतल्या आहेत यामुळे पठारे यांनी विधानसभेचे जोरदार तयारी केली आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात 366 बूथ, 14 गण, 7 गट असून पारनेर शहरातील नगरपंचायतचाही यात समावेश आहे. त्यादृष्टीने डॉ.श्रीकांत पठारे हे मातोश्रीवरील बैठकीवरुण आल्यापासून सातत्याने मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत असून आता गण, गटनिहाय बैठकांचे सत्रच डॉ.श्रीकांत पठारे यांनी सुरु केले आहे. मतदान घडवून आणण्यासाठी लागणारी शिवसैनिकांची फौज उभी करण्याचे काम यात सुरु असून महाविकासआघाडीतील सर्वच मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना डॉ.श्रीकांत पठारे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत.

Maharashtra Election 2024 : ठाकरेंच्या भेटीनंतर पारनेरमध्ये मोठी घडामोड, पठारे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता Read More »

Maharashtra Assembly Election : आचारसहितेचा उल्लंघन, भाजपकडून गंभीर आरोप अन् आमदार धंगेकर विरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेचे वारे वाहत असल्याने महाविकास आघाडी कडून आणि महायुतीकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे. यातच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसहितेचा उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून आरोप करण्यात आला आहे की, आमदार धंगेकर दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना फराळ वाटप करून त्यांना प्रलोभित करत आहेत,असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असून, फराळ वाटपासाठी वापरला गेलेला टेम्पो देखील पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. तर दुसरीकडे धंगेकर पुन्हा एकदा कसब्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप प्रताप वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते.

Maharashtra Assembly Election : आचारसहितेचा उल्लंघन, भाजपकडून गंभीर आरोप अन् आमदार धंगेकर विरोधात गुन्हा दाखल Read More »