DNA मराठी

राजकीय

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

NEET-UG परीक्षा प्रकरणात CBI ने दाखल केली पहिली FIR

NEET-UG Exam : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या NEET-UG परीक्षेतील अनियमिततेबाबत सीबीआयने पहिली एफआयआर दाखल केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.  माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने   दोन विशेष पथके तयार केली आहेत, जी पाटणा आणि गोध्रा येथे जाणार आहेत. या परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस अगोदर लीक झाल्याने सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. तसेच NTA चे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना हटवून प्रदीप सिंह खरोला यांची नवे डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयांचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) स्वागत केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे NEET UG परीक्षेतील वादांवर कारवाई केल्याबद्दल आभार मानले आहेत. याशिवाय NEET UG परीक्षेतील अनियमिततेचा तपास CBI कडे सोपवल्याबद्दल आणि NTA च्या महासंचालकांना हटवल्याबद्दल IMA ने शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत. ‘गोपनीयतेने परीक्षा व्यवस्थित पार पाडा’ “विद्यार्थ्यांची सध्याची पिढी हे भारताचे भविष्य आहे आणि महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षा कठोरता आणि गोपनीयतेच्या सर्वोच्च मानकांसह आयोजित करणे अत्यावश्यक आहे,” असे IMA निवेदनात म्हटले आहे. असोसिएशन सरकारने सुरू केलेल्या आवश्यक सुधारणांचा एक भाग म्हणून NEET विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा विचार करते आणि भविष्यातील परीक्षांचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी मजबूत यंत्रणेच्या गरजेवर जोर देते. आयएमएने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया जलद करण्याची सरकारला विनंती केली जेणेकरून वेळेवर प्रवेश सुनिश्चित करता येईल.  IMA ने सरकारच्या उपक्रमाला आपला भक्कम पाठिंबा दिला आणि विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीच्या सुरक्षित भविष्याबद्दल आशा व्यक्त केली.

NEET-UG परीक्षा प्रकरणात CBI ने दाखल केली पहिली FIR Read More »

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »

Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी पुन्हा नियुक्ती, काँग्रेसकडून विरोध

Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोध केला आहे.  काँग्रेसचे म्हणणे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन “चुकीचा आदर्श” ठेवत आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “राज्य सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत भाजप कार्यकर्त्याची नियुक्ती करण्याचा पर्याय घेतला आहे. निवड का केली? सरकारी वकील या महत्त्वाच्या पदावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची नियुक्ती करून भाजप आघाडी सरकारने चुकीचा आदर्श ठेवला आहे. निकम यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाचा शिंदे सरकारने फेरविचार करावा, असे पटोले म्हणाले. भाजपने निकम यांना या जागेवरून माजी खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा 16,514 मतांनी पराभव केला. गायकवाड यांना 445,545 मते मिळाली, तर निकम यांना 429,031 मते मिळाली. भाजपचे उमेदवार म्हणून नामांकन दिल्यानंतर, निकम यांनी 29 खटल्यांचा राजीनामा दिला होता, ज्यात मुंबईतील आठ खटल्यांचा समावेश होता ज्यात त्यांची विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मे महिन्यात त्यांनी विधी व न्याय विभागाकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यांच्या पराभवानंतर, निकम यांची पुनर्नियुक्ती करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय म्हणजे ते आता सर्व 29 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करतील.

Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी पुन्हा नियुक्ती, काँग्रेसकडून विरोध Read More »

UGC NET 2024 Exam रद्द, सीबीआय करणार तपास

UGC NET 2024 Exam Cancelled: वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) निकालावरील वाद अजून शांत झालेला नाही की शिक्षण मंत्रालयाने UGC-NET परीक्षाही रद्द करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, यूजीसी-नेट परीक्षा नव्याने घेतली जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द केली आहे. एजन्सीने म्हटले आहे की प्रथमदर्शनी असे संकेत आहेत की परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड केली गेली आहे, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. शिक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की परीक्षा प्रक्रियेची उच्च पातळीची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने UGC-NET जून 2024 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल. तसेच हे प्रकरण सखोल तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात येत आहे.  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 18 जून रोजी UGC-NET जून 2024 ची परीक्षा घेतली होती. NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 11,21,225 उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 6,35,587 महिला, 4,85,579 पुरुष आणि 59 तृतीय लिंग उमेदवार आहेत. एकूण नोंदणीकृत उमेदवारांपैकी 9,08,580 उमेदवार म्हणजेच 81 टक्के उमेदवार परीक्षेला बसले.

UGC NET 2024 Exam रद्द, सीबीआय करणार तपास Read More »

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, पाच वेळा आमदारांने सोडला पक्ष

Assembly Election 2024 : ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह  हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस आमदार किरण चौधरी आणि त्यांची कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना दिल्ली गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत. किरण चौधरी मुलगी श्रुती चौधरी यांना भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट मागत होत्या, पण पक्षाने त्यांच्या जागी महेंद्रगडमधून काँग्रेसचे आमदार राव दान सिंह यांना तिकीट दिले, त्यामुळे किरण चौधरी नाराज झाले होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.  बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल देखील उपस्थित राहू शकतात. काँग्रेस अध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात किरण चौधरी म्हणाल्या, “मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी चार दशकांपासून काँग्रेसचा एकनिष्ठ सदस्य आहे. मी माझे जीवन पक्ष आणि लोकांसाठी समर्पित केले आहे. हरियाणात, मी दिवंगत बन्सीलाल लाल आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार दिवंगत पती सुरेंद्र सिंग यांच्या वारशाचे देखील प्रतिनिधित्व करते. मात्र, माझ्यासारख्या प्रामाणिक आवाजाला जागा न देता हरियाणात काँग्रेस पक्षाचा कारभार अतिशय नियोजनबद्ध आणि पद्धतशीरपणे दडपून टाकला जात आहे. “ अपमान सहन करण्याची मर्यादा असते- श्रुती चौधरी आपल्या राजीनामा पत्रात श्रुती चौधरी यांनी लिहिले की, “हरयाणातील काँग्रेस पक्ष दुर्दैवाने व्यक्तीकेंद्रित झाला आहे ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या हिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे जेणेकरून मी माझ्या लोकांचे हित आणि मी ज्या मूल्यांसाठी उभी आहे ते जपता येईल. अपमान सहन करण्याची मर्यादा असते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हरियाणामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि यावेळी सलग दोनवेळा दहा जागा जिंकणाऱ्या भाजपची बरोबरी केली होती, परंतु विधानसभेच्या आधी निवडणुकीच्या निमित्ताने आता पक्षांतर्गत वाद सूरु झाला आहे.

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, पाच वेळा आमदारांने सोडला पक्ष Read More »

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा 

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असून लवकरच शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राऊत मुंबईत कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार 3 महिन्यात बदलणार आहे. यासोबतच नव्या सरकारचे शिल्पकार उद्धव ठाकरे असतील, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या नेत्यांशी विचारमंथन केले. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकामुळे राज्यात राजकीय वातावरण तापला आहे. महाविकास आघाडीकडून तीन जागांवर ठाकरे गट तर एक जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला आहे.  काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील आगामी एमएलसी निवडणुकीसाठी शिवसेनेने (यूबीटी) उमेदवारांच्या घोषणेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने उद्धव सेनेला आपल्या उमेदवारांची नावे मागे घेण्यास सांगितले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीच्या  साथीदारांशी चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार ठरवला.  घटक पक्षांशी चर्चा करूनच उमेदवार आणि जागा निश्चित होतील, अशी आम्हाला आशा होती. मात्र, नंतर परस्पर संमतीने दोघांमध्ये जागा वाटून घेण्यात आल्या. उद्धव यांचे उमेदवार तीन जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा  Read More »

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद

Kathua Encounter : कठुआमध्ये सुरू असलेल्या चकमकीत CRPF चा एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  कबीर दास असे या शहीद जवानाचे नाव आहे.  मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी यापूर्वीच ठार झाला आहे. कठुआ हिरानगरच्या सोहल गावात झालेल्या या चकमकीत एक नागरिकही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंजाब जम्मू सीमा सील कठुआ ऑपरेशन लक्षात घेऊन भारतीय लष्कराने जम्मू पठाणकोट सीमा रस्त्याचा ताबा घेतला आहे. यावेळी प्रत्येक वाहनाची तपासणी करून पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. सध्या जम्मू भागात सर्व प्रकारे हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. दोडामध्ये पाच जवान जखमी, जैशने घेतली जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची आघाडी असलेल्या काश्मीर टायगर्सने डोडा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून निष्क्रिय होती. अचानक याने दोडामध्ये सक्रियता दाखवली आहे. सध्या दोडामध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाचे पाच जवान आणि एक एसपीओ जखमी झाले आहे.

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद Read More »