DNA मराठी

राजकीय

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर अडकले हनीट्रॅपमध्ये, पाकिस्तानला देत होते गोपनीय माहिती

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती देण्याचा आरोपात अटक करण्यात आली होती. तर आता या प्रकरणात एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एटीएसच्या तपासात प्रदीप कुरुलकर पाकिस्तानला माहिती देत होते हे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात एटीएसने न्यायालयात 2 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. काय आहे प्रकरण?डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ‘झारा दासगुप्ता’ नावाच्या पाकिस्तानी महिलेसोबत त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि झाराने कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. कुरुलकर यांनी झाराला डीआरडीओमधील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. एटीएसच्या तपासात काय समोर आले?एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.कुरुलकर आणि झारा यांच्यातील संवादामध्ये अनेक संवेदनशील गोष्टी उघड झाल्या आहेत. झाराने कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली, असा एटीएसचा दावा आहे. एटीएसने या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कछरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यात कुरुलकर यांच्यावर शासकीय रहस्य कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होईल, असे म्हटले आहे. कुरुलकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच, विशेष न्यायालयात आरोपमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेअर केलेली माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये होती, असा युक्तिवाद त्यांचे वकील हृषिकेश गानू यांनी केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत, कुरुलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर अडकले हनीट्रॅपमध्ये, पाकिस्तानला देत होते गोपनीय माहिती Read More »

Love Jihad Law : लव्ह जिहाद कायदा, राज्य सरकारचे अभिनंदन; माजी खासदार सुजय विखे

Love Jihad Law : महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या मसूद्यासाठी पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची रचना आणि कार्यया समितीमध्ये महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील. ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. राजकीय प्रतिक्रियाभाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर मध्ये बोलताना या कायद्याचे स्वागत केले. ते म्हणाले, “राज्यामध्ये लव्ह जिहाद च्या विरोधामध्ये सक्षम कायदा आणला जात आहे, राज्य सरकारचा हा पाऊल स्वागत आहे. मात्र, पूर्णपणे ड्राफ्ट तयार झाल्यावर आणि त्यामध्ये काय आहे हे पाहिल्यावरच मी त्यावर प्रतिक्रिया देईल. आता तरी हा कायदा येत असल्यामुळे मी सरकारचा अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो.” इतर राज्यांचा अनुभवदेशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. जर महाराष्ट्रात हे कायदा लागू झाला तरमहाराष्ट्र हे दहावे राज्य असेल ज्या राज्यात असा कायदा असेल. विविध संघटनांची मागणीराज्यातील विविध हिंदू संघटनांनी आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनीही लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. भविष्यातील दृष्टिकोनहा कायदा राज्यातील धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यात मदत करेल, असे आश्वासन राज्य सरकार तर्फे दिले जात आहे. समितीने कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करण्यात येणार आहे, ज्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

Love Jihad Law : लव्ह जिहाद कायदा, राज्य सरकारचे अभिनंदन; माजी खासदार सुजय विखे Read More »

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये

HSC Exam: जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वॉररूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुके व अहिल्यानगर शहरातील १०९ पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे एक हजारपेक्षा अधिक ब्लॉकवर गुगलमीट, ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व केंद्र संचालकांना दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला जात आहे. यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून आनंददायी परीक्षा पॅटर्नअंतर्गत कॉपी मुक्तीसाठी अत्यंत जागरुकतेने काम करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच तांत्रिक सहायक डॉ.अमोल बागूल जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये Read More »

Ahilyanagar News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप

Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी,धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. पक्षांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,पक्षसंघटनेची बांधणी,त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप Read More »

महिला व बालविकास विभागात 18 हजार 882 पदांची भरती जाहीर

Anganwadi Worker Recruitment : महिला व बालविकास विभागात तब्बल 18 हजार 882 पदांची भरती होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18882 पदांची भरती करण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास विभागात 18 हजार 882 पदांची भरती जाहीर Read More »

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय?

Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय? Read More »

New Income Tax Bill 2025 अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार जाणून घ्या काय असणार खास

Nirmala Sitharaman : नवीन आयकर विधेयक 2025 अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 13 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. हे विधेयक प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मांडले जाईल. हे विधेयक सादर केले जाईल आणि नंतर पुनरावलोकन समितीकडे पाठवले जाईल. पुनरावलोकनानंतर, ते चर्चेसाठी आणि स्वीकृतीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले जाईल. नवीन आयकर विधेयकात काय नवीन असेल? सोपी भाषाअर्थमंत्र्यांनी आधीच माहिती दिली होती की नवीन आयकर विधेयक असे असेल की ते कोणालाही सहज समजेल. त्यामुळे यामध्ये सोपी भाषा वापरली जाईल. कर विवाद निर्माण करणारे आणि आवश्यक नसलेले शब्द काढून टाकले जातील. हे विधेयक समजण्यास सोपे आणि सोपे असेल. त्याच्या सादरीकरणामुळे आयकराशी संबंधित कायदेशीर वाद देखील कमी होतील. कोणत्याही अनावश्यक तरतुदी नसतीलजुन्या आयकर कायद्यात अनेक तरतुदी होत्या ज्या आवश्यक नव्हत्या, परंतु हे नवीन विधेयक अनेक अनावश्यक तरतुदी काढून टाकून त्या कमी करेल. कर वर्षसध्या, अनेक लोकांना कर निर्धारण वर्ष, आर्थिक वर्ष, मागील वर्ष यासारख्या संज्ञा नीट समजत नव्हत्या, त्यामुळे आता नवीन आयकर विधेयकात हे शब्द काढून टाकले जातील आणि ‘कर वर्ष’ वापरला जाईल. अधिकाधिक टेबलेलोकांना विधेयक सहज समजावे यासाठी, अटी आणि शर्ती आणि लांबलचक स्पष्टीकरणांऐवजी लहान आणि समजण्यास सोप्या तक्त्यांचा वापर करण्यात आला आहे. नियम सोपे केलेकरदात्यांना सर्व नियम सहज समजतील यासाठी नियम सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी, स्टँडर्ड डिडक्शन, रजा इन कॅश यासारख्या महत्त्वाच्या तरतुदी एकाच ठिकाणी टेबलद्वारे स्पष्ट केल्या जातील. जेणेकरून करदात्यांना आयकराशी संबंधित नियम चांगल्या प्रकारे समजतील. कायदेशीर बाबी कमी होतीलसध्या आयकर विभागाशी संबंधित अनेक कायदेशीर प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा प्रकरणांमध्ये वाढ रोखण्यासाठी, सोपे नियम बनवले जात आहेत. जेणेकरून कायदेशीर प्रकरणांची संख्या वाढू नये आणि करदात्यांना सर्व तरतुदी सहज समजू शकतील.

New Income Tax Bill 2025 अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार जाणून घ्या काय असणार खास Read More »

सुदर्शन घुले करणार मोठा खुलासा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणार नवीन ट्विस्ट?

Santosh Deshmukh Murder Case: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज खंडणी प्रकरणात सीआयडी पोलीस कोठडीत असणाऱ्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आवादा कंपनीला कोणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली होती? त्याने खंडणीची काही रक्कम घेतली आहे का? याबाबत सध्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेसह वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. याबाबत देखील त्याच्याशी चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सुदर्शन घुले करणार मोठा खुलासा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणार नवीन ट्विस्ट? Read More »

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

Acharya Satyendra Das Death: अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 85 वर्षीय महंत सत्येंद्र दास यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) च्या न्यूरोलॉजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले- भगवान रामाचे परम भक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! आम्ही भगवान श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकाकुल शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन Read More »