DNA मराठी

राजकीय

ajit pawar

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Pune Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा पुणेकरांसमोर मांडला.  ‘अष्टसूत्री प्रगती’ (विकासाचे आठ स्तंभं) आणि ‘अष्टावधानि नेतृत्व’ (आठ दिशेचं सजग नेतृत्व) या तत्त्वांवर आधारित हा जाहीरनामा पुण्याच्या सुयोग्य आणि जबाबदार विकासाची दिशा दर्शवतो.   सहा महिन्यांचे सखोल सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद मोहिमेतून तयार झालेल्या या जाहीरनाम्याने पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे. यामधून जनता घोषणेपेक्षा खात्रीशीर अंमलबजावणीची अपेक्षा ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘अष्टसूत्री–अष्टावधानि’ हा आराखडा अजितदादांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय अनुभवावर आधारित आहे. सतत जागरूक राहणे, प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. वेळेत निर्णय घेणे, नियोजन आणि शिस्तबद्ध काम आणि कामात विलंबाला शून्य सहनशीलता हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. अष्टसूत्री प्रगती – पुण्याच्या पुनर्बांधणीसाठी आठ स्तंभ दररोज पाणीपुरवठा: सर्व 41 प्रभागांमध्ये उच्च दाबाने नियोजित वेळापत्रकानुसार पाण्याचा पुरवठा, टँकरची आवश्यकता संपविणे, पाईपलाईन गळती पूर्णपणे बंद करणे आणि भामा–मुळा–मुठा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे.   वाहतूककोंडीमुक्त, खड्डेमुक्त रस्ते: अपूर्ण लिंक रस्त्यांची जोडणी, मुख्य 150 किमी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, एचसीएमटीआरची अंमलबजावणी, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करणे आणि नव्याने समाविष्ट गावांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे.   स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा: 100% कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, अपयशी प्रकल्पांचं पुनरुज्जीवन, हरित सोसायट्यांना प्रोत्साहन आणि 2029 पर्यंत पुणे ‘स्वच्छ सर्वेक्षण’मधील अग्रगण्य तीन शहरांत समावेश करणे. हाय-टेक आरोग्य सेवा: 200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, या नव्या रुग्णालयांची उभारणी, परवडणारी तपासणी सेवा (PPP पद्धतीने), टेलिमेडिसिनचा उपयोग आणि गरीब रुग्णांसाठी वाढीव आर्थिक सहाय्य.   प्रदूषणमुक्त, उत्तम हवामानयुक्त पुणे: पूर नियंत्रण, ड्रेनेज नियोजन, नाल्यांचे संरक्षण, हरित विस्तार, पर्यावरण सक्षमीकरण आणि हवामान बदलास सज्ज असा शाश्वत विकास आराखडा.   झोपडपट्टी पुनर्वसन व सुरक्षित पुनर्विकास: मूळ जागेवर पुनर्वसन, कायदेशीर धारकांना संरक्षण, पारदर्शी कारभार, उपजीविकेची हमी आणि जुन्या इमारतींच्या रहिवाशांच्या नेतृत्वात पुनर्विकास प्रक्रिया.   पुणेकरांसाठी जबाबदार प्रशासन निर्मिती: मोफत मेट्रो व बस प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट, व्याजमुक्त स्वयंरोजगार कर्ज आणि तातडीची प्रतिसादक्षमता असलेलं प्रशासन.   पुणे मॉडेल शाळा: CBSE/ICSE दर्जानुसार 150 आधुनिक शाळा, प्रशिक्षित शिक्षक, विज्ञान- संगणक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, मराठी माध्यमावर आधारलेली इंग्रजी शिक्षण पद्धती आणि पालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार नसणार.  

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत. “जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे. “माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे.

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »

chandrashekhar bawankule on ajit pawar

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने गेल्या सात वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांच्या या गंभीर आरोपामुळे आता महायुती मधील घटक पक्ष भाजप देखील आक्रमक झाला असून अजित पवारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांच्या अडचणीत वाढ होईल असं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादांनी जे मानलं खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपवर टीकाटिपणी केली आहे, भारतीय जनता पार्टी बद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की मित्र पक्षाचे मनभेद आणि मतभेद होणार नाहीत, अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला हव्या होत्या,परंतु जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाळलं नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना म्हणाले की, रवींद्र चव्हाण म्हणाले ती गोष्ट खरी आहे की मित्र पक्षात खडा पडेल असं विधान कोणी करू नये. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निवडणूक लढण्यासाठी काहीही व्हिजन नसतं, तेव्हा लोक निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा भावनात्मक करून मतं घेण्याचा प्रयत्न करतात असं बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे विकास काम करू शकत नाही तसेच त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जाहीरमान्यावर देखील भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनाची व केलेला जाहीरनामा काहीच पूर्ण करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची काम केली, ते उद्धव ठाकरे करू शकत नाही असेही ते म्हणाले. मुंबईला सर्व जगातलं सुविधायुक्त शहर, भारतातला सर्वात विकसित शहर, मुंबईचा व्हिजन 2047 चा मॅप देवेंद्रजींनी केला आहे . उद्धव ठाकरे यांच्या कार्यकेळाचा अभ्यास जर केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, किती खोटारड्या घोषणा केल्या त्या लोकांना माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेला जाहीरनामा किंवा दिलेली आश्वासन, काहीच पूर्ण करणार नाही.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले Read More »

lakshman hake

Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंची CM फडणवीसांसह अजित पवारांवर टीका

Lakshman Hake : ऊर्जा स्थळावर येऊन कोट्यवधी रुपयांचा निधी दिला म्हणजे काही वेगळे किंवा मोठे काम केल्याचा आव आणू नये, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला लावला आहे. तर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ऊर्जा स्थळावर येऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी दिला म्हणजे सरकारने उपकार केले, असे होत नाही. नेमके ओबीसींसाठी आणि दीन-दुबळ्यांसाठी राज्य सरकारने काय केले, हा खरा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारकडून निधी दिल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी त्यातून ओबीसी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. केवळ निधी जाहीर केल्याने खूप काही केले, असे मानता येणार नाही, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केला आहे. यानंतर मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील लक्ष्मण हाके करत आहे.

Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंची CM फडणवीसांसह अजित पवारांवर टीका Read More »

oplus 16908288

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले. विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध Read More »