DNA मराठी

राजकीय

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे. प्रकरण काय? आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गणेश ऋषींदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळु लिंबाजी सानप पवनसिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याणसिंग अमरसिंग बमनावत सुनिल रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रय गोषिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव डिगंबर गंगाराम कुरेवाड किरण रविंद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्णा गवते कृष्णा दत्ता मुजगुले विजय हनुमंत जोगदंड निवास बाबुसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रविण भाऊसाहेब शिनगारे बप्पासाहेब रखमाजी भुसारे सुरज गोरख बिक्कड सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट?

Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट? Read More »

मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तात्काळ मदतीची Vijay Wadettiwar यांची मागणी

Vijay Wadettiwar : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, “ज्वारी, कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पशुधनाचाही फटका बसला आहे. अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळच्या अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पिक हिरावून घेतले आहे.” ते पुढे म्हणाले की, “एकीकडे सरकार कर्ज काढत आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लागेल तर अजून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे.” शिवभोजन थाळी व अन्य योजना रखडल्या राज्यात शिवभोजन थाळी या योजनेचे सात महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत, ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. “गरीबांसाठीच्या योजना बंद केल्या जात आहेत. ज्यांनी मेहनत केली त्यांचे पैसे रोखून ठेवले आहेत. सरकार त्यांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगावरही टीका पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “देशात मतचोरी सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे दिल्यानंतर आयोगाने पत्रकार परिषद घेतली, पण प्रश्नांना उत्तर दिले नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्रे लिहिली, तरी आयोगाने उत्तर दिले नाही. उलट राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागणे हे गजब आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल ते “माफी मागणार नाहीत.”

मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तात्काळ मदतीची Vijay Wadettiwar यांची मागणी Read More »

ahmednagar fake land documents case district collector complaint

महसूल फेरफारावर संशय: अर्जदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहिल्यानगर  :अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील तालुक्यातील सर्व्हे नं. २१५/८ब या जमिनीबाबत खोटे व बनावट दस्त तयार करून मालकी हक्क मिळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारस अब्दुल अजीज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केली आहे,  य अप्र्कारांची चौकशी करून  दोषींवर कठोर कारवाईची मागणी कारस अब्दुल अजीज केली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी अर्जदाराच्या वडिलांच्या व भावाच्या नावे असलेली मिळकत कायमस्वरूपी कुटुंबाच्या ताब्यात होती. मात्र ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी बनावट खरेदीखताचा दस्त तयार करण्यात आल्याचा संशय त्यांनी वेक्त करत. त्यानंतर २१ ऑगस्ट १९९२ रोजी “चूक दुरुस्ती लेख” दस्त बनवत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे,या दस्तात अर्जदाराची बनावट सही दाखवण्यात आली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, “मी कधीही असा दस्त केला नाही किंवा त्यावर सही दिलेली नाही. हा प्रकार पूर्णपणे खोटा व बनावट आहे.” महसूल दप्तरी गंभीर विसंगती अर्जदाराने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत फेरफार क्र. १४६७६ मंजूर दि. ०३/०८/१९९२ यावर विशेष लक्ष वेधले आहे. हा फेरफार तहसिलदार नगर यांच्या आदेश एसआर१६/९२, दि. १३/०७/१९९२ नुसार झाला. तक्रारीनुसार, या वाटपाप्रमाणे ७/१२ वेगळे नोंदवले गेले. मात्र वाटपाप्रमाणे खरेदीखतात संबंधितांची नावे दाखल नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की खरेदी दस्तातील संबंधितांना अगोदरच माहिती कशी मिळाली?या विसंगतीवरून महसूल दप्तरातील फेरफार हे संशयास्पद असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. शासनाची दिशाभूल करून जमिनी बळकावण्याचा कट अर्जदाराचा आरोप आहे की खोट्या कागदपत्रांच्या आधारे महसूल खात्याची दिशाभूल करण्यात आली असून, नोंदीत फेरफार करून कोट्यावधीची मालमत्ता बळकावण्याचा कट रचण्यात आला आहे. हा प्रकार केवळ बनावट दस्तापुरता मर्यादित नसून, संपूर्ण संगनमताचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढे काय होऊ शकते? या तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर सुरू होण्याची शक्यता आहे. महसूल विभागाच्या नोंदी, फेरफार मंजुरी आदेश, ७/१२ उतारे आणि खरेदीखत यांची सविस्तर चौकशी करून कागदपत्रे खरी की बनावट हे स्पष्ट होणार आहे.दोषींविरुद्ध पुरावे ठोस आढळल्यास जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेल्यास दोषींना कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. वारसांचा संताप गेल्या काही वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यात खोटे कागदपत्रे व महसूल फेरफार करून जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले असल्याची चर्चा आहे. अशा घटनांमुळे प्रामाणिक प्लॉट आणी जमीनमालकांत असंतोष पसरला आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांत त्वरित व कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महसूल फेरफारावर संशय: अर्जदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव Read More »

chhagan bhujbal

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. तर आता नाशिक जिल्ह्यात एकच पक्षाचे 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना, आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे 7 आमदार असताना, पालकमंत्री पदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायला लावेल. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच 7 आमदार एकच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेन, एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो, तर 7 आमदारांसाठी पालकमंत्री पदासाठी शक्ती लावा. पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही सर्व मंत्र्यांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचे झेंडावंदन जास्तीत जास्त मी केल आहे. 1991 पासून मी झेंडावंदन करतो आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले Read More »

bachu kadu

Bachu Kadu : जय श्री राम बोलून निवडणूक जिंकता येते; बच्चू कडूंचा महायुतीला टोला

Bachu Kadu : आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत. अशी टीका बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू राज्य सरकार वर हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता पुन्हा एका बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत. ते पूर्ण करण्यासाठी बाध्य करतील अशी रचना करत आहोत. निवडणुकीच्या काय जास्त मेहनीत करण्याची गरज नाही. EVM मशीन आहेच, काय ठप्पे मारायचे ते मारायचे. उभे रहायचे काय नाही ते ठरवावे लागेल. सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. अनेक जन फोन येतात कशाला उभ राहता तुमच्या विरोधातच मतदान पडणारच आहे. त्यामुळे भाजपच्याच कार्यालयात 10 दिवसाचा गणपती बसवणार आहे.

Bachu Kadu : जय श्री राम बोलून निवडणूक जिंकता येते; बच्चू कडूंचा महायुतीला टोला Read More »

navnath ban

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की “उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी.” ते पुढे म्हणाले की “देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.” मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मातोश्री-2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत.” राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीस उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले “2024 च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमच्या गटाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनता तुम्हाला घरी बसवून आली. 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील.” नारायण राणे यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरताना राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणे यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा.”

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल Read More »

ahul gandhi bharat yatra dna marathi

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा

दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधून ‘वोटर अधिकार यात्रा’ ला सुरुवात केली आहे. या यात्रेचा उद्देश देशातील निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या ‘वोट चोरी’च्या आरोपांवरचे मुद्दे मांजाणते समोर मांडणे आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. १३०० किमी, २० जिल्ह्यांतून प्रवास हि यात्रा सुमारे १३०० किलोमीटर लांबीची ही यात्रा बिहारमधील २० जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधी विविध ठिकाणी पायपीट करणार असून, ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या यात्रेसाठी जोरदार तयारी केली आहे. १ सप्टेंबरला पटण्यात महामेळावा यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी पटण्याच्या गांधी मैदानात होणार असून, तेथे मोठा जनसमुदाय जमण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी या सभेतून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ‘वोट चोरी’ आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या अभावावर कठोर भूमिका मांडणार आहेत. राजकीय पार्श्वभूमी विश्लेषकांचे मत आहे की, बिहारमधून सुरू झालेली ही यात्रा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरुण मतदार, शेतकरी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न मानला जातो. काँग्रेसची भूमिका पक्षाचे म्हणणे आहे की, लोकशाही प्रक्रियेचे रक्षण आणि मतदार हक्कांचे संरक्षण हीच या यात्रेची खरी ताकद आहे. कोणत्याही प्रकारे मताधिकार हिरावला जाणार नाही, हा संदेश काँग्रेस या मोहिमेद्वारे देत आहे.

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा Read More »

cancel trade talks with india

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण करणारा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. नवी दिल्ली येथे २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार चर्चांना अमेरिकेने अचानक रद्द केले. हा निर्णय २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या नवीन कस्टम शुल्कांशी थेट संबंधित आहे. या शुल्कांमुळे भारतीय वस्तूंवर २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. पोलाद, अॅल्युमिनियम, औषधे, कपडे आणि कृषी उत्पादनांवर याचा गंभीर परिणाम होईल. निर्यातदारांमध्ये चिंता असून अमेरिकेतील ग्राहकांनाही महागाईचा फटका बसेल. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेचे हे पाऊल अन्यायकारक असून, याचा दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. भारताने हे प्रकरण जागतिक व्यापार संघटना (WTO) समोर नेण्याची तयारी दर्शवली आहे. व्यापार चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत डिजिटल व्यापार, सेवा क्षेत्रातील सहकार्य, औषधनिर्मिती उद्योगातील निर्यात, उच्च तंत्रज्ञान गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रातील व्यापार सवलतीवर चर्चा होणार होती. मात्र चर्चांचा रद्द केल्यामुळे तोडगा काढण्याची प्रक्रिया थांबली आहे. तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या स्थानिक उद्योगांना संरक्षण देणे आणि निवडणूकपूर्व राजकारण हा या निर्णयामागचा प्रमुख हेतू आहे. तथापि, भारताने राजनैतिक मार्ग खुले ठेवत संवाद साधण्याचे संकेत दिले आहेत.अमेरिका आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षांत व्यापारी मुद्द्यांवर मतभेद झाले आहेत. आता चर्चांचा रद्द आणि शुल्कवाढीमुळे हा तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या परिस्थितीवर दोन्ही देश कसा मार्ग काढतात, याकडे जागतिक बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी Read More »