DNA मराठी

राजकीय

abhijeet bichukale

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका

Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले. मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Raj Thackeray on Tapovan Tree Case: नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे साधू- महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील 1800 झाडे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तर आता या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करुन उद्योगपतींच्या घशात घालण्याता सरकारचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच!

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा Read More »

ram khade

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांच्यावर नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र आता देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक Read More »

imran khan

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या, असीम मुनीर जबाबदार?

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात असताना हत्या करण्यात आली असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं देखील इमरान खान यांच्या हत्येच्या बाबतीत मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या केली असल्याचा दावा बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पाकिस्तान सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाच्या बाहेर या बातमीनंतर PTI समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अशी देखील पोस्ट व्हायरल होतीय की, इमरान खान यांची बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना मारहाण झाल्याचा दावा देखील या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अफगाण टाइम्सने दिलेल्या बातमीच्या आधारे बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने इमरान खान यांची हत्या गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी केली असल्याचा दावा केला आहे. अफगाण टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रावळपिंडीच्या आदियाला जेलमधून बाहेर काढला असल्याचं सांगण्यात आला आहे.

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या, असीम मुनीर जबाबदार? Read More »

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले. तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप Read More »

election

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा

BMC Election: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मतदार याद्यांतील घोळ आणि प्रभागाच्या तोडफोडीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक झालेत. मतदार यादीतील सगळ्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोवर निवडणूक घेऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. एका मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहेत. ज्या मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेलीत. आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत. मतदारयादीत त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मतदारयाद्यांत 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. मतदारयादीत जी नाव दुबार आहेत अशी नाव हटवण्यासाठी महानगरपालिकेने निवडणूक आयोगाने वेळ मागितला असल्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीत एकाच व्यक्तीच नाव हे एक-दोन नव्हे तर तर 103 वेळेस असल्याचं देखील महानगरपालिकेने सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा खरा ठरलाय. याबाबत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं. 4 लाख 33 मतदाराची नाव दुबार नोंदवली गेल्यानं हि संख्या 11 लाखांवर गेली. नोंदवल्या गेलेल्या बनावट मतदाराची इत्यंभूत माहिती नसल्यानं प्रशासन यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत हि मोहीम चारणारे असून निवडणूक वार्डांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही मोहीम राबवणार आहेत.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा Read More »

mallikarjun kharge

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री?

Mallikarjun Kharge : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीत डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोणत्याही किंमतीत आपले पद सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी वारंवार सांगितले आहे की ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांचा एक गट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागे एकत्र येत आहे आणि त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहे. खरगे हे कर्नाटकातील एक प्रमुख दलित व्यक्ती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दलित व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अनेक पत्रे पोहोचली आहेत ज्यात खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अधिकारी, माजी आमदार, पत्रकार, बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसह प्रभावशाली आवाजांनी खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन केले आहे. 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले पत्र 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले आणि दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या पत्रात म्हटले आहे की नेतृत्वात दलितांचे दशकांपासून असलेले कमी प्रतिनिधित्व दुरुस्त करण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे. 1956 मध्ये कर्नाटकच्या स्थापनेपासून दलित मुख्यमंत्री नसल्याबद्दल या पत्रात दुःख व्यक्त केले आहे. त्यात म्हटले आहे की या समुदायाची काँग्रेसशी दृढ निष्ठा आहे. नेत्यांनी सांगितले की खरगे हे मुख्यमंत्रीपदासाठी एक सक्षम नेते आहेत. त्यांचा प्रचंड अनुभव, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकातील लोकांशी असलेले सखोल संबंध त्यांना यावेळी राज्याचे मार्गदर्शन करण्यासाठी योग्य उमेदवार बनवतात. दोन नेत्यांमधील मुख्य लढाई मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य लढाई सध्या शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात आहे. शिवकुमार हे राज्यात काँग्रेसला सत्तेत आणण्याचे श्रेय दिले जाणारे एक प्रसिद्ध वोक्कालिगा नेते आहेत. नागा साधूंच्या एका गटाने शनिवारी शिवकुमार यांची त्यांच्या घरी भेट घेतली, त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा घेण्याची विनंती केली. अडीच वर्षांचा फॉर्म्युला काय होता? कर्नाटक काँग्रेसमधील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला “अडीच वर्षांचा फॉर्म्युला” पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिद्धरामय्या हे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री राहतील असे ठरले होते. आता, सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहू इच्छितात असे वृत्त आहे. या वादाबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कधीही असे म्हटले नव्हते की ते फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील. कार्यकाळात बदल होईल की नाही हे पूर्णपणे हायकमांडवर सोडले आहे. आम्ही स्वतः कोणतेही बदल करू शकत नाही. जर अशी परिस्थिती उद्भवली तर काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल.”

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री? Read More »

anagar nagar panchayat

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले

Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..? त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली. तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले Read More »

girish mahajan

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

Girish Mahajan : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भाजपाचे सहा नगरसेवकदेखील बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले तीनही अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी, तर महाविकास आघाडीकडून रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यातील एकूण तीन नगरपालिकांमध्ये भाजपचे तीन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडणून आले आहे.

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध Read More »