DNA मराठी

ताज्या बातम्या

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले

Tamil Nadu ₹ Symbol : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर आता तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ₹ हे चिन्ह काढून टाकले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने ₹ च्या जागी ‘ரூ’ (ru) चिन्ह स्वीकारले आहे, जे तमिळ लिपीतील एक अक्षर आहे. देशभरात ₹ चिन्ह बदलण्याची ही पहिलीच घटना आहे आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा वादाशी याचा संबंध जोडला जात आहे. रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केलेल्या भारतीय तिरंग्यापासून प्रेरित होते. धर्मलिंगम हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांची रचना पाच निवडलेल्या चिन्हांमधून निवडण्यात आली. हे चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आले आणि ते भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह बनले. विशेष म्हणजे, धर्मलिंगम हा तामिळनाडूतील एका माजी आमदाराचा मुलगा आहे. ₹ च्या जागी नवीन चिन्हआता, तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावण्याचा निर्णय राज्यात सुरू असलेल्या हिंदी विरोधी चळवळीशी जोडला जात आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्ध बऱ्याच काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अलीकडेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नामुळे भारतातील प्राचीन भाषा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्थानिक भाषा नाहीशा होत आहेत, असे स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणच्या भाषांचे उदाहरण दिले, जिथे हिंदीच्या दबावाखाली स्थानिक भाषा मरत आहेत. त्यांच्या मते, हिंदीने अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्यामुळे त्या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा भाषेबाबत वाद सुरू झाला आहे. तामिळनाडू सरकारच्या या पावलामुळे राज्याची, विशेषतः हिंदीबद्दलची भूमिका स्पष्ट होते आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले Read More »

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदले असून 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. संगमनेरमध्ये देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर विखेंनी बाळासाहेब थोरात यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा मुद्दा. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पनाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. या प्रकल्पामुळे या भागातील विकासाच्या नव्या दिशा खुल्या होतील, परंतु त्याचबरोबर राजकीय नेत्यांमधील वादही तीव्र होत आहेत. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील हा वाद केवळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतच नाही तर त्याच्या राजकीय फायद्यांबाबतही आहे. आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालयसंगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कार्यालयाची स्थापना आश्वीलाच होणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. या मुद्द्यावरून थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय शह-काटशह सुरू आहे. राजकीय परिणामया संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर पडतील. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे दोन्ही दिग्गज नेते आहेत आणि त्यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या वादाचा फायदा इतर राजकीय पक्षांना घेता येऊ शकतो, ज्यामुळे राज्यातील राजकीय स्थिती अधिक जटिल होऊ शकते. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या संघर्षाचे परिणाम राज्याच्या राजकीय भूमितीवर पडतील आणि त्याचा फायदा घेण्यासाठी इतर राजकीय पक्षांना संधी मिळू शकते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

जिओ देणार ग्राहकांना दिलासा, एलोन मस्कसोबत घेणार मोठा निर्णय

Jio partners with Elon Musk’s SpaceX:  देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने मोठा निर्णय घेत भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी  स्पेसएक्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहाकांना  स्टारलिंकची उपग्रह-आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणार आहे. मात्र ही सेवा सुरु होणार की नाही. याबाबत निर्णय भारत सरकार घेणार आहे. जर सरकारने परवानगी दिली तर ही सेवा देशात सुरु होणार आहे. या सेवेमुळे भारतातील दुर्गम भागात हाय-स्पीड, कमी-लेटन्सी इंटरनेट प्रदान करण्यास मदत होणार आहे.  प्रत्येक गावात इंटरनेट जिओ आणि स्पेसएक्समधील या भागीदारीअंतर्गत, जिओ त्यांच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे स्टारलिंक सेवा प्रदान करेल. यामुळे, भारतातील अधिकाधिक लोकांना सॅटेलाइट ब्रॉडबँड उपलब्ध होईल. या युतीचा उद्देश ज्या भागात आतापर्यंत ब्रॉडबँड सुविधा मर्यादित होत्या, जसे की गावे, शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम व्यवसाय केंद्रे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. जिओफायबरला अधिक मजबूत बनवेलजिओ केवळ स्टारलिंक हार्डवेअर विकणार नाही तर ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी इन्स्टॉलेशन आणि अॅक्टिव्हेशन सपोर्ट देखील देईल. या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्टारलिंकची सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जिओच्या विद्यमान ब्रॉडबँड सेवा जसे की जिओएअरफायबर आणि जिओफायबरला आणखी मजबूत करेल. यामुळे ज्या भागात पारंपारिक फायबर नेटवर्क टाकणे कठीण आहे तेथे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे शक्य होईल. जिओचे ग्रुप सीईओ मॅथ्यू उमान यांनी या भागीदारीला भारतातील डिजिटल क्रांतीतील एक महत्त्वाचे पाऊल म्हटले. ते म्हणाले, ‘आमचे उद्दिष्ट प्रत्येक भारतीयाला, तो देशात कुठेही राहत असला तरी, हाय-स्पीड आणि परवडणारे इंटरनेट प्रदान करणे आहे.’ स्पेसएक्ससोबतची आमची भागीदारी जिओच्या या मोहिमेला आणखी बळकटी देईल. जिओच्या ब्रॉडबँड इकोसिस्टममध्ये स्टारलिंक जोडून, आम्ही देशभरात कनेक्टिव्हिटीची व्याप्ती वाढवत आहोत. स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि सीओओ ग्विन शॉटवेल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या जिओच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.’ अधिकाधिक लोक, व्यवसाय आणि संस्था स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेटशी जोडता याव्यात यासाठी आम्हाला जिओसोबत काम करण्याची आणि भारत सरकारकडून आवश्यक त्या मंजुरी मिळविण्याची उत्सुकता आहे. जरी हा करार जिओ आणि स्पेसएक्समध्ये झाला असला तरी, भारतात स्टारलिंकचे अधिकृत प्रक्षेपण अजूनही भारत सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल. यासाठी, भारताच्या दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि अधिकृतता केंद्र (IN-SPACE) कडून परवानगी घ्यावी लागेल.

जिओ देणार ग्राहकांना दिलासा, एलोन मस्कसोबत घेणार मोठा निर्णय Read More »

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल

Vijay Wadettiwar : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल Read More »

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत

Ravindra Dhangekar : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण, असे शिंदे म्हणाले. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.   उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला. बाळासाहेबांचे जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उबाठावर लगावला. याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेले नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.   धंगेकर म्ङणाले की, शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. धंगेकर यांच्यासमवेत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे,  प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.  यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग

Champions Trophy Final: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरवातीपासून जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड संघाला फायनलमध्ये पाच चुका भारी पडल्या ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. मॅट हेन्री अंतिम सामन्यातून बाहेरन्यूझीलंडच्या आशांना सर्वात मोठा धक्का सामन्यापूर्वीच बसला कारण या स्पर्धेत सर्वाधिक 10 बळी घेणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या नाथन स्मिथने 2 षटकांत 22 धावा दिल्या. फिरकी गोलंदाजी खेळता आली नाहीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलदाजांवर हल्लाबोल केला मात्र त्यानंतर फिरकी गोलंदाजी सुरू होताच विकेट पडू लागल्या. पहिल्या 75 धावांमध्ये, फॉर्ममध्ये असलेले तिन्ही फलंदाज यंग, रॅचिन आणि विल्यमसन फिरकीच्या जाळ्याचे बळी पडले. मधल्या षटकांच्या फलंदाजी स्लोमधल्या षटकांच्या टप्प्यात किवी फलंदाजांना एकेरी आणि दुहेरी धावा करता आल्या नाहीत. डॅरिल मिशेलने 63 धावा केल्या असतील, पण त्यासाठी त्याला 101 चेंडू लागले. अशा परिस्थितीत, धावगती बरीच कमी झाली आणि त्यानंतर, न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेगवान गोलंदाजी निराशाजनक कामगिरीजेव्हा किवी गोलंदाज गोलंदाजी करायला आले तेव्हा रोहित शर्माने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आणि त्यांना बॅकफूटवर नेले. त्यानंतर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि पहिल्या 10 षटकांत त्यांनी भरपूर धावा दिल्या. त्यामुळे 252 चा स्कोअर आणखी कमी झाला. श्रेयस अय्यरचा महत्त्वाचा झेल सोडलाएकेकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु श्रेयस अय्यरने शानदार पुनरागमन केले. त्यानंतर, जेव्हा भारताला जिंकण्यासाठी 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती, तेव्हा 44 धावांवर अय्यरचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गती भारताकडे सरकली आणि किवींचे खांदे झुकले.

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग Read More »

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला…

Virat Kohli : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून याबाबत स्वतः विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर विराट कोहलीने पुष्टी केली आहे की तो कुठेही जाणार नाही आणि देशासाठी खेळत राहील. कोहलीला निवृत्तीबद्दल थेट विचारण्यात आले नसले तरी, माजी भारतीय कर्णधाराने त्याच्या भविष्याबद्दलचे त्याचे हेतू स्पष्ट केले. या प्रश्नाचे उत्तर देताना कोहली म्हणाला, “हो, नक्कीच. म्हणजे, शुभमनने म्हटल्याप्रमाणे, मी शक्य तितके या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो, मी इतका वेळ कसा खेळू शकलो, जिथे शक्य असेल तिथे त्यांचा खेळ सुधारण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि हो, जसे ते बरोबर म्हणतात, जेव्हा तुम्ही निघता तेव्हा तुम्हाला ते ठिकाण चांगल्या स्थितीत सोडायचे असते.” “आमचा हाच प्रयत्न आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला हेच हवे आहे की जेव्हा आम्ही कोणत्याही टप्प्यावर खेळ पूर्ण करतो, तेव्हा आमचा संघ पुढील 8 -10 वर्षे जगाशी सामना करण्यास सज्ज असेल आणि या खेळाडूंमध्ये निश्चितच ते करण्याची प्रतिभा आहे आणि खेळाची जाणीव देखील आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, त्यांनी आधीच काही प्रभावी खेळी केल्या आहेत, श्रेयसने ती भूमिका बजावली आहे, सुंदर, केएलने सामने संपवले आहेत तरहार्दिक एक मॅच विनर खेळाडू आहे.” ‘ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते’चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ब्लॅककॅप्सवर चार विकेटनी संस्मरणीय विजय मिळवल्यानंतर, कोहलीने खुलासा केला की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याचा संघ पुनरागमन करू इच्छित होता, जिथे भारताने पाच सामन्यांची मालिका 1-3 अशी गमावली होती. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीला स्वतः आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना संघर्ष करावा लागला, पण आज रात्रीचा विजय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे दुःख कमी करण्यास मदत करेल. कोहली म्हणाला, “सर्वप्रथम, आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते, एक मोठी स्पर्धा जिंकायची होती आणि आम्ही ते केले. म्हणून, ही एक अद्भुत भावना आहे, इतक्या अद्भुत तरुणांसोबत खेळणे खूप छान आहे, चेंजिंग रूममध्ये खूप प्रतिभा आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, ते भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जात आहेत.” “आम्हाला मदत करायला, आमचा अनुभव शेअर करायला आणि संधी मिळेल तेव्हा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायला आनंद होतो. हे खेळाडू मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत आणि म्हणूनच आमचा संघ इतका मजबूत आहे.” या स्पर्धेत कोहलीने पाच सामन्यांमध्ये 218 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक होते.कोहली म्हणाला, “मला वाटते की भूतकाळात हरवलेले विजेतेपद जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला वेगवेगळ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि जर तुम्ही या स्पर्धेकडे पाच सामन्यांच्या आधारे पाहिले तर प्रत्येकाने कुठेतरी योगदान दिले आहे आणि म्हणूनच आम्ही ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झालो.” लोकांनी खूप प्रभावी खेळी खेळल्या आहेत, खूप प्रभावी स्पेल आहेत आणि केवळ सामूहिक प्रयत्नांमुळेच तुम्हाला विजेतेपद मिळू शकते आणि मला खूप आनंद आहे की आम्ही एक संघ म्हणून खेळू शकलो आणि आम्हाला ते खरोखर आवडले.

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला… Read More »

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला. यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद Read More »