DNA मराठी

ताज्या बातम्या

aus vs wi

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो

Aus Vs WI : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त 27 धावांवर रोखला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य होते. परंतु वेस्ट इंडिज संघ फक्त 27 धावांवर गारद झाले. कसोटी क्रिकेटमधील हा 70 वर्षातील सर्वात कमी धावसंख्या आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यातील हा सर्वात कमी धावसंख्या आहे. या सामन्यात एकूण सात फलंदाज शून्यावर बाद झाले. 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने कहर केला. दुसऱ्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने तीन विकेट घेतले. तर या डावात सहा विकेट घेतले. तर स्कॉट बोलँडने हॅटट्रिक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअर 26 – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, ऑकलंड – 1955 27 – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, किंग्स्टन, 2025 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, ग्वेबेर्हा, 1986 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, 1924 यासह स्टार्कने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात 400 बळी पूर्ण केले आणि बोलँड कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा 10 वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो Read More »

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 ’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

Maharashtra Politics: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 ’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ Read More »

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश

Devendra Fadnavis: बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून आता या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 235 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने ठेवींवर 10 ते 18 टक्के व्याजदराचे आकर्षण ठेव योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पोलीस, विशेष तपास यंत्रणांना गतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रकाश सोळंके, अर्जुन खोतकर, सुरेश धस, संतोष दानवे, सुभाष देशमुख, विजयसिंह पंडित उपस्थित होते.

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश Read More »

iphone

Iphone 17e ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत अन् फीचर

Iphone 17e: लोकप्रिय मोबाईल कंपनी अँपल लवकरच बाजारात iphone 17e लॉन्च करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार 2026 च्या सुरुवातील बाजारात हा फोन लॉन्च होणार आहे. आयफोन १७ई हा अँपलच्या पारंपारिक प्रीमियम डिव्हाइसेसपेक्षा अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे अधिकाधिक वापरकर्ते अँपलच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. A19 प्रोसेसर, फेस आयडी आणि ४८ एमपी कॅमेरा सारख्या फिचर्समुळे तो त्याच्या विभागात एक अतिशय मजबूत स्पर्धक बनतो. iphone 17e फिचर्स आयफोन १७ईमध्ये अँपलचा नवीनतम A19 चिपसेट असू शकतो, जो सध्याच्या आयफोन १६ईमधील A18 पेक्षा चांगले कार्यप्रदर्शन आणि एआय इंटिग्रेशन करण्यास अधिक सक्षम असेल. ही चिप Apple Intelligence (AI) च्या आगामी अपडेट्ससाठी पूर्णपणे तयार असेल. कॅमेरा: डिव्हाइसला एकच 48MP चा रियर कॅमेरा मिळेल, जो AI आधारित इमेज प्रोसेसिंगसह आणखी चांगला परफॉर्मन्स देईल. डिझाइन: डिझाइनमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. नॉच आणि फेस आयडी सिस्टम जसेच्या तसे राहण्याची शक्यता आहे. डायनॅमिक आयलंड: यावेळी देखील डायनॅमिक आयलंड फीचर मिळण्याची फारशी आशा नाही, म्हणजेच ते फक्त प्रीमियम मॉडेल्सपुरते मर्यादित असेल. नवीन C2 मॉडेम उपलब्ध असेल का? C2 मॉडेमबद्दल असा अंदाज आहे की तो 17e मध्ये येऊ शकतो, परंतु बहुतेक टेक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की Apple ते iPhone 18 मालिकेने सुरू करू शकते. तरीही, A19 चिप आणि इतर अपग्रेडमुळे ते त्याच्या श्रेणीत खूप आकर्षक बनते. iPhone 17e ची संभाव्य किंमत आणि लाँच तारीख ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या मते, iPhone 17e पुढील वर्षी लाँच होईल. यासोबतच, M5 चिपसह नवीन MacBook Pros, नवीन iPads आणि एक नवीन Mac बाह्य मॉनिटर देखील सादर केले जातील. आयफोन 17ई ची किंमत आयफोन 16ईच्या जवळपास असू शकते जेणेकरून बजेट सेगमेंटमध्ये अँपलची पकड मजबूत होईल.

Iphone 17e ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत अन् फीचर Read More »

img 20250714 wa0001

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई

Shanaishwar Temple : शनैश्वर देवस्थानच्या ( Shanaishwar Temple) नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट अ‍ॅप आणि संकेतस्थळांमुळे झालेल्या फसवणुकीप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाच यूआरएल धारकांसह (अ‍ॅप तयार करणारे) त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याने तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी शनैश्वर देवस्थानच्या नावाने बनावट अ‍ॅप्स (Fake apps) व संकेतस्थळ तयार करून, देवस्थानची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ऑनलाईन पूजा, अभिषेक, तेल अर्पण, तसेच व्हीआयपी दर्शनासाठी नोंदणी सुरू केली होती. यामार्फत त्यांनी भक्तांकडून अनियमित शुल्क आकारले. आरोपींनी स्वतःचे पुजारी नेमून हे व्यवहार सुरू ठेवले होते आणि यामार्फत अवैध मार्गाने पैसे उकळण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारातून शनैश्वर भक्तांची व देवस्थानची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अ‍ॅप तयार करणाऱ्या यंत्रणेशी संबंधित युआरएल्स आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. यासोबतच, आरोपींना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे सध्या भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, देवस्थानने अधिकृत अ‍ॅप अथवा सेवा सुरू केली आहे की नाही, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता देण्याची मागणीही भक्तांकडून होत आहे.

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई Read More »

ujjwal nikam elected to rajya sabha dna news marathi

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड

उज्ज्वल निकम, हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. नवी दिल्ली – ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ८० अन्वये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा सार्वजनिक जीवनातील विशेष कर्तृत्वासाठी राष्ट्रपतींना राज्यसभेसाठी १२ सदस्य नामनिर्देश करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करत निकम यांच्यासह आणखी तीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवउज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, प्रभाकरन हत्याकांड, तेलगी बनावट शिक्के प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गुन्ह्यांत सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या दीर्घ अनुभवामुळे राज्यसभेतील कायदा, न्याय, आणि गुन्हेगारी न्यायव्यवस्था संबंधित चर्चांना एक नवा आयाम मिळणार आहे. निवडीचे व्यापक महत्त्वराज्यसभेवर अशा तज्ज्ञांची नियुक्ती केल्याने संसदेमध्ये अधिक व्यावसायिक व अभ्यासपूर्ण चर्चेला चालना मिळते. उज्ज्वल निकम यांची कारकीर्द, त्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन, आणि न्यायव्यवस्थेतील प्रगल्भ समज यामुळे विधीविषयक धोरणांमध्ये अधिक चांगले योगदान मिळण्याची शक्यता आहे. इतर नामनिर्देशित सदस्यनिकम यांच्यासह परराष्ट्र क्षेत्रातील जाणकार हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. या चौघांची नियुक्ती ही संसदेत विविध क्षेत्रांतील विचार व तज्ज्ञता समाविष्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र धोरणातील जाणकार — हरषवर्धन श्रृंगलासंयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व आणि माजी परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत राहिलेल्या श्रृंगला यांनी परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची नियुक्ती जागतिक घडामोडींच्या चर्चेत मोलाची भर घालेल. संस्कृती व इतिहास अभ्यासक — डॉ. मीनाक्षी जैनभारतीय संस्कृती, इतिहास व सामाजिक विषयांवर संशोधन करणाऱ्या डॉ. जैन यांचे लेखन व विचार समाजप्रबोधनासाठी प्रसिद्ध आहे. राज्यसभेत त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग धोरणांच्या सांस्कृतिक पैलूंमध्ये होईल. समाजसेवा व शिक्षण क्षेत्रातील कार्य — सी. सदानंदन मास्टरग्रामीण शिक्षण व सामाजिक न्यायासाठी झटणारे मास्टर यांनी शैक्षणिक सुधारणा व लोकसहभागाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणारे धोरण तयार करण्यात त्यांचा सहभाग उपयुक्त ठरे उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची पावती नसून, भारतीय संसदेच्या गुणवत्तापूर्ण आणि सखोल चर्चेसाठी एक नवा टप्पा ठरणार आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाच्या विधीविषयक धोरणनिर्मितीस निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड Read More »

ashish chanchlani and elli avram's instagram post created a stir on social media dna marathi

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट?

मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. मुंबई : – प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Elli AvRam) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आशीषने जुलै १२ रोजी इंस्टाग्रामवर एलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत केवळ “Finally!” असे लिहिले आहे. हा फोटो आणि त्यावरील शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले असून त्यावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चारच्या सुरु झाली आहे आहे . या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी अफवा पुन्हा एकदा गडद झाल्या आहेत. काही चाहत्यांनी याला “प्रेमसंबंधाची अधिकृत कबुली” मानले आहे, तर काहींनी हा नवीन म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड प्रमोशन असण्याची शक्यता वर्तवली आहे. दोघांनी याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List Awards इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री आणि जवळीक यावर नेटकरी चर्चा करत होते. मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. या पोस्टनंतर काही तासांतच Instagram वर लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहते “Congratulations”, “Finally together” अशा प्रतिक्रिया देत असून काही बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एली अवराम ही “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” (“kis kisako pyaar karoon”) या चित्रपटांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री असून ती बिग बॉस  (big boss ) च्या एका सिझनमध्येही झळकली होती. आशीष चंचलानी हा युट्यूबवरील एक लोकप्रिय विनोदी कंटेंट क्रिएटर असून त्याचे व्हिडीओ जगभरात पाहिले जातात. सध्या तरी दोघांकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. ही पोस्ट केवळ वैयक्तिक प्रेम व्यक्त करणारी आहे की कोणत्यातरी प्रोजेक्टचा भाग, याविषयी स्पष्टता नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. https://www.instagram.com/p/DL__mwju1Up/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MTBoeGV0cmprajlycA== थोडक्यात  अफवा नव्हे, स्पष्ट संकेत? गेल्या काही महिन्यांपासून आशीष आणि एली अवरामच्या मैत्रीविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र, त्यानंतर आशीष – एली यांनी कोणताही खुलासा केला नाही. आता जुलै १२ रोजी आशीषने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला असून, त्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. पोस्टखाली लिहिलं आहे – “Finally”. या एकाच शब्दाने नेटकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे – ही रिलेशनशिपची अधिकृत घोषणा आहे की फक्त एखाद्या नव्या कोलॅबोरेशनची झलक? चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पोस्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी, शुभेच्छा, आणि ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स’चा वर्षाव केला आहे. काही प्रसिद्ध कलाकारांनीही या पोस्टखाली “So happy for you both!”, “Finally Indeed!” अशा कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या पोस्टला ‘इंटरनेटवरचं नवीन IT कपल’ असं बिरूद दिलं आहे. ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांनी #AshEl आणि #Finally ट्रेंड सुरू केला आहे. काही चाहत्यांनी लग्नाचीही शक्यता बोलून दाखवली आहे. रिलेशनशिप की प्रोफेशनल स्टंट? तथापि, अनेक जाणकार आणि डिजिटल माध्यम तज्ज्ञांचे मत आहे की ही पोस्ट एखाद्या नव्या डिजिटल प्रोजेक्टचा भाग असू शकते — कदाचित म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड कोलॅबरेशन! कारण आशीष चंचलानी ही सोशल मीडियावर सर्जनशील आणि युनिक प्रमोशनल स्टंटसाठी ओळखला जातो. या आधीही अनेक कलाकारांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवांद्वारे आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचा प्रचार केला आहे, त्यामुळे काही युझर्स याकडे साशंकतेने पाहत आहेत. कोण आहेत हे दोघे? आशीष चंचलानी हे नाव सोशल मीडियावर नवीन नाही. त्यांच्या विनोदी व्हिडीओज, स्केचेस आणि वेब सिरीज यांमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. ३० दशलक्षांहून अधिक युट्यूब सब्स्क्राइबर्स असलेला आशीष हा देशातील अग्रगण्य डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहे. एली अवराम ही एक स्वीडिश-भारतीय अभिनेत्री असून, “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मध्ये भाग घेतल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पुढे काय? सध्या तरी या दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या रिलेशनशिप जाहीर केलेली नाही. पोस्टवरून हा खरोखर प्रेमाचा स्वीकार आहे की फक्त एखाद्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग — याबाबत स्पष्टता नाही. मात्र सोशल मीडियावरील उत्साह पाहता, या विषयावर अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. एका साध्या “Finally” कॅप्शनने आंतरजालावर एवढी मोठी चर्चा निर्माण होईल, याचा प्रत्यय या पोस्टने दिला आहे. आशीष आणि एली यांच्यात खरंच प्रेम आहे की हा फक्त प्रमोशनल गिमिक आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात मात्र ही जोडी घर करून बसली आहे. पुढील अपडेट्सकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत!

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट? Read More »

img 20250712 wa0012

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली

Sawedi land Scam पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला Sawedi Land Scam : सावेडी येथील कोट्यवधींचा वादग्रस्त भूखंड घोटाळा प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर कार्यालयात खरेदी-विक्री थांबवण्याचे प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, आता काही मंडळींनी तालुकास्तरावरील कार्यालयांमार्फत व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधितांनी पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, सावेडीमधील सर्वे नं. २४५/ब १ (०.७२ हेक्टर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या भूखंडावर गेल्या ३५ वर्षांत कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. मात्र सध्या याच जमिनीवर मोठा व्यवहार करण्याचा अट्टहास सुरू असून, संबंधितांच्या वतीने महसूल विभागावर दबाव आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून, मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तु निष्ठा अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच वादी-प्रतिवादींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावेत, अशा असे पत्र दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ या सह दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणेकडेही या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून, या संदर्भात पुढील तपास सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुकास्तरावरील इतर नोंदणी कार्यालयांतून व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे, यापुढील काळात पोलीस आणि महसूल यंत्रणांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली Read More »

pawar's ncp has a new president, jitendra awhad's explanation

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

पवारांच्या राष्ट्रवादीत नवा अध्यक्ष ? या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. मात्र, या चर्चांना स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे फेटाळून लावले आहे. “ही केवळ खोडसाळपणाची अफवा आहे,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. शनिवारी संध्याकाळनंतर विविध माध्यमांवर जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती झपाट्याने पसरू लागली. अनेकांनी या घडामोडींचा अर्थ पक्षातील अंतर्गत उलथापालथ म्हणून लावायला सुरुवात केली. मात्र, आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, “जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहणार. त्यांच्या राजीनाम्याच्या अफवा त्या-त्या मंडळींनी स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत. पक्षात अशा पद्धतीने निर्णय घेतले जात नाहीत.” दरम्यान, जयंत पाटील यांनी यापूर्वीच (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सूचक विधान केले होते – “नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे.” यामुळेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळकटी मिळाली. मात्र, अधिकृतरीत्या त्यांनी कोणताही लेखी राजीनामा दिलेला नाही, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. ते नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही माध्यमांच्या माहितीनुसार, १५ जुलैला या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांचे मतया चर्चांमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या तुलनेत आपला पक्ष अधिक तरुण, लढाऊ आणि परिवर्तनशील आहे, हे दाखवण्यासाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांचा मार्ग वेगळा आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. राजीनामा झाला की नाही, याचा निर्णय अधिकृतपणे होईपर्यंत जयंत पाटील यांच्या पुढील वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व अखेर शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर – जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण Read More »

sawedi plot scam police entry

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण

Sawedi land scam  – तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार स्थगित अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam  – सावेडी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात आता पोलिसांचीदेखील एन्ट्री झाली असून महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांनी वादी-प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत होऊ नयेत, अशा सूचनाही सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाचरणे यांनी तक्रार करताना “जमिनीच्या व्यवहारात अडथळे निर्माण केले जात आहेत” असा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, चौकशीवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत पाचरणे? या प्रकरणात पाचरणे हे शिरूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनीच ही पोलीस तक्रार दिली आहे. त्यांचा दावा आहे की, डायाभाई अब्दुल आजीज यांच्याकडून पारसमल शहा यांनी विकत घेल्याचा दावा केलाय, शहा  यांच्याकडून जनरल मुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार पाचरणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, या खरेदी खताच्या कायदेशीरतेवर संशय व्यक्त होत असून त्यावरच संपूर्ण वाद उद्भवला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (Sawedi land scam ) सावेडीच्या भूखंड नोंदणी प्रकरणाने नगर शहराला हादरवून सोडले आहे. तीन दशके झोपलेल्या कागदांनी अचानकच ‘जिवंत’ होण्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर) आणि २४५/ब २ (०.६३ हेक्टर) असा एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाचा भूखंड – ज्या जमिनीची ३५ वर्षांपूर्वी कोणतीही व्यवहार प्रक्रिया झाली नाही, ती अचानक नोंदणीसाठी समोर आली, या प्रकरणांमध्ये अजित दादाभाई आणि साजिद दयाभाई यांचे जनरल मुखत्यार म्हणून रमाकांत सोनवणे राहणार स्टेशन रोड अहिल्यानगर यांनी तक्रार केली आहे त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सावेडी भागातील एक भूखंड 1991 मध्ये खरेदी करण्यात आल्याचं खरेदी खत सादर करण्यात आलं आहे. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये ही नोंद करण्यात आली. त्यात काही बाबी संशयास्पद असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रांताधिकारी सुधीर पाटील अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही व्यवहार होऊ नये, असे पत्र देण्यात आले आहे .

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण Read More »