DNA मराठी

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

stock market

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर

Stock Market : शेअर मार्केटच्या फसवणुकीतून सामान्य माणसांच्या पैसे बुडवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर मुंबईत खाते सुरू करून, त्या खात्यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपी कवडे यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जवळपास एक कोटी रुपयांची लाच ऑनलाइन घेतली अशी माहिती आहे. मयत व्यक्तीच्या नावाचे खाते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचे होते. पोलीसांनी बँकेतून ही रक्कम इतर ठिकाणी पाठवून, नंतर ती कॅश करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीसाची नियंत्रण कक्षात बदली झाली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरत आहे. शेवगाव-पाथर्डी परिसरात झालेल्या या घोटाळ्यात लोकांना जास्त परतावा मिळेल असे सांगून फसवले गेले. अंदाजे 1500 हजार ते 2000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती उध्वस्त झाली आहे. मी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्या होत्या, तेव्हा परिस्थिती खूपच भयानक होती. काहींनी जमीन विकून पैसे गुंतवले, काहींनी तर बँकेतून कर्ज काढले तर यामध्ये मोल मजुरी करणाऱ्या महिलांनीही पैसे लावलेले आहेत तर काही दोन्ही भांडे करणाऱ्या महिलांनी मुलांसाठी ठेवलेली रक्कमही या ठिकाणी गुंतवली आहे, काहींनी कुटुंबाचे राखीव पैसे घालून शेअरमध्ये गुंतवले, तर काहींनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे पण वापरले. अनेक कुटुंबांना आज आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटाळ्याच्या काळात पोलीस केस न घेता पाहत राहिले, अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोक पोलीस ठाण्यात येत होते, पण पोलीस का गप्प होते, हे उत्तर मला जवळपास वर्षभरांनी कळले. एकीकडे सामान्य कुटुंब संपत चालले आहेत, तर दुसरीकडे त्याच प्रकरणात पोलीस कोट्यावधी रुपयांची लाच घेत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे “काय होणार यावर? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” स्थानिक कार्यकर्ते देखील ठाम आहेत. ते म्हणतात, “फक्त नियंत्रण कक्षात बदली करून काय होणार? अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे!” असा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. शेवगाव-पाथर्डीतील शेअर मार्केट घोटाळा प्रकरण आता केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणी पोलीस प्रशासनाच्या जवाबदारीचा सत्यपरिक्षण बनले आहे.

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर Read More »

img 20250813 wa0015

Ahilyanagar News : आरोपींची निर्दोष मुक्तता : प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणातून भळगट यांची सुटका

Ahilyanagar News : अन्न व औषध प्रशासनाने १५ ऑक्टोबर २०२० रोजी अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करत जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणात व्यापारी शुभम रमणलाल भळगट (वय २४, रा. शेरकर गल्ली, तेलीखुंट) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात दोष सिद्ध न झाल्यामुळे भळगट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. सदर प्रकरणात मधुकर पवार (वय ३३), अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून कारवाईची नोंद झाली होती. फिर्यादीनुसार, १३ लाख ९१ हजार ७२९ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा शुभम जनरल स्टोअर्समधून मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. फिर्यादीत शुभम भळगट यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवले हिरा पान मसाला, सुगंधित तंबाखू ,गोवा,वी 1 तंबाखू , राजश्री पान मसाला असल्याचा आरोप होता. तसेच त्यांनी पुरवठादाराची माहिती न दिल्याचे आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा २००६ तसेच भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी यंत्रणेकडून आरोप सिद्ध करण्यास आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने, आणि कारवाईतील प्रक्रियात्मक त्रुटींमुळे न्यायालयाने भळगट यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. स्नेहा लोखंडे यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला असून, जोशना ससाणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Ahilyanagar News : आरोपींची निर्दोष मुक्तता : प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणातून भळगट यांची सुटका Read More »

is the savedi land scam a clue to negligence or collusion in revenue records.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा?

Sawedi land scam – अहिल्यानगर तालुक्यातील मौजे सावेडी येथील स.नं. २४५ या जमिनीच्या नोंदी व खरेदी व्यवहाराचा मागोवा घेतला, तर एकाच वेळी अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. अपर तहसीलदारांच्या तपास अहवालातून समोर आलेला घटनाक्रम केवळ महसूल विभागातील बेपर्वाईचाच नाही, तर संगनमताचा संशयही दृढ करतो. १९९१ सालचा खरेदीदस्त क्रमांक ४३० हा व्यवहार, त्यानंतर झालेले वाटप, चुक दुरुस्ती लेख, आणि २०२५ मध्ये अचानक ३४ वर्षांनी झालेला फेरफार — हे सर्व दस्तऐवज पाहता कायदेशीर प्रक्रियेतले पायऱ्या जाणीवपूर्वक टाळल्याचे स्पष्ट दिसते. महसूल कायद्यानुसार खरेदी देणारा आणि घेणारा या दोघांना कलम १५०(२) नुसार नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, येथे ना टपालाद्वारे नोटीस पाठवली, मलामत्तेवर नोटीस लावली, ना ग्रामपंचायतीमार्फत प्रसार केला. त्याऐवजी अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करण्याची “तातडी” दाखवली गेली. प्रश्न असा की — या तातडीमागे फक्त अधिकारी बेपर्वाई होती का, की काहींचा फायदा करून देण्याची जाणीवपूर्वक धडपड? सदर जमिनीची स्थिती १९९२ च्या फेरफार क्रमांक १४६७६ नुसार स्पष्ट होती. अब्दुल अजीज दायाभाई यांना ०.७२ हे.आर. तर दायाभाई अब्दुल अजीज यांना ०.६३ हे.आर. असे वाटप झाले होते. तरीदेखील खरेदीदस्तात संपूर्ण १.३५ हे.आर. क्षेत्राचा उल्लेख करून, वाटपापूर्वीचे आणि नंतरचे गट क्रमांक मिसळून विक्री दाखवण्यात आली. म्हणजे, नोंदीतील आकडेवारी आणि प्रत्यक्ष वाटप यात उघड विसंगती निर्माण झाली. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे १९९१ सालचा दस्त प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला की नाही, याबाबतच अद्याप खात्री नाही. अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर, डे बुक यांसारखी आवश्यक मूळ नोंदीच उपलब्ध नाहीत. दस्त वैध आहे की बनावट, हे ठरवण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर आधारित फेरफार मंजूर केला. ही केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर थेट कायद्याच्या गळचेपीसारखी बाब आहे. अहवालात नमूद केलेल्या समांतर प्रकरणांतून एक धोकादायक पॅटर्न समोर येतो — ३०-३५ वर्षे जुने खरेदीदस्त, ज्यात विक्रेते-खरेदीदार दोघेही मृत, आणि मग वारसदार किंवा इतर लाभार्थी अचानक विलंब माफी अर्जासह अपील दाखल करतात. अनेकदा हे दस्त बनावट असल्याचे विरोधी पक्ष सांगतो. महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अशा संशयास्पद फेरफारांना संमती मिळते आणि जमिनीच्या मालकीत दीर्घकाळानंतर ‘कायदेशीर’ फेरबदल होतात. सावेडी प्रकरण हा फक्त एक तुकडा आहे. पण तो आपल्याला महसूल नोंदी व्यवस्थेत खोलवर रुतलेल्या दोषांचे दर्शन घडवतो. अधिकारी जबाबदारी टाळतात, नियम मोडले जातात, आणि परिणामी काही हातांना कोटींच्या जमिनी सहज मिळतात. अशा प्रकरणांवर कठोर चौकशी होऊन जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. अन्यथा, जमीन माफियांच्या जाळ्यात अडकलेली महसूल यंत्रणा सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांसाठी न्यायालयीन लढ्याचं रणांगण बनून राहील. सावेडीचा धडा स्पष्ट आहे — महसूल नोंदी ही केवळ सरकारी कागदपत्रं नाहीत, तर त्या प्रत्येक गावाच्या मालमत्तेचा इतिहास असतात. त्या इतिहासात खोटा अध्याय लिहू देणं म्हणजे आपल्या भूमीच्या अस्मितेवरच गदा आणणं होय. १. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, सावेडी 1 – चूक: ३४ वर्षांपूर्वीचा खरेदीदस्त तपासणी न करता, ७/१२ वरील वास्तविक नावे व दस्तातील नावे पडताळणी न करता, चुकीची नोंद फेरफार क्र. ७३१०७ मध्ये घेतली. २ – गंभीर मुद्दा: कलम १५०(२) नुसार खरेदी देणारा आणि घेणारा (किंवा त्यांचे वारसदार) यांना नोटीस देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. संशय: एवढ्या जुन्या प्रकरणात अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करून ‘तातडी’ दाखवली गेली. २. तत्कालीन मंडळाधिकारी, सावेडी 1- चूक: ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नोंदीची कोणतीही चौकशी न करता मंजुरी देणे. २ – गंभीर मुद्दा: दस्त वैध आहे का, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद झाला का, याबाबत कोणतीही खातरजमा केली नाही. ३. दुय्यम निबंधक कार्यालय, अहमदनगर क्र. १ (दक्षिण) 1 – चूक: १९९१ चा दस्त क्रमांक ४३० नोंदवला गेला का, याबाबतची मूळ रजिस्टर, अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर इ. अभिलेख अनुपलब्ध. २ – गंभीर मुद्दा: दस्त नोंदणीचा पुरावा पूर्ण नसताना महसूल कार्यालयाला स्पष्ट माहिती न देणे. ३ – संशय: जर हा दस्त बनावट किंवा अपूर्ण नोंद असलेला असेल, तर त्याची त्वरित नोंद महसूल विभागाला देणे अपेक्षित होते. ४. खरेदी घेणारे – पारसमल मश्रीमल शाह 1 – चूक/भूमिका: ३४ वर्षांनंतर अचानक फेरफार अर्ज दाखल करणे, तेही मूळ व्यवहारातील पक्षकार (खरेदी देणारे) मृत झाल्यानंतर. २ – संशय: एवढ्या मोठ्या विलंबानंतर जमीन आपल्या नावावर घेण्याचा प्रयत्न, तोही सर्व कायदेशीर प्रक्रिया टाळून. ५. खरेदी देणाऱ्यांचे वारस/संबंधित पक्ष थोडक्यात दोष 1 – थेट प्रशासनिक जबाबदारी: तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी (नोंदीची तपासणी व मंजुरी). २ – नोंदणी प्रक्रियेतील कमतरता: दुय्यम निबंधक कार्यालय. ३ – संभाव्य संगनमत: काही वारस व अधिकारी यांचा फायदा घेण्याचा व्यवहार.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा? Read More »

ration

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ

Maharashtra Politics : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना 53 हजार 910 रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटलमागे 150 रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये (1700 रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी 71 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ Read More »

maharashtra police requirement

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर

Maharashtra Police Requirment : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर Read More »

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद

Ahilyanagar News : मानवी हक्कांचा भंग करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुरुडगाव परिसरात छापा टाकून तब्बल दोन वर्षांपासून कैदेत ठेवून गोठ्यात जबरदस्तीने काम करण्यास लावण्यात आलेल्या तीन वेठबिगारांची सुटका केली. या प्रकरणी जाकिश उर्फ बबड्या काळे (वय 35, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद आणि बळजबरीचे वास्तव तपासानुसार, अटक आरोपीने एक कामगार नागपूरहून तर दोन कामगार उत्तर प्रदेशहून आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना आपल्या घराशेजारील गायीच्या गोठ्यात कैद करून ठेवले होते. बाहेर जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कामगारांवर सतत लक्ष ठेवून, मारहाण करत व धमकावत त्यांच्याकडून गोठ्यातील कामे करवून घेतली जात होती. या काळात पीडितांना मोबदला न देता केवळ जेवणापुरतेच सोय करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खात्रीशीर माहितीवर छापा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना आरोपीकडे तीन जणांना बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकाने बुरुडगाव परिसरातील आरोपीच्या घरावर छापा टाकून तिघांना सुरक्षितपणे मुक्त केले. पीडितांची ओळख सुटविण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी एक जण नागपूरचा आहे, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आरोपीने त्यांना वेठबिगार म्हणून आणले होते आणि दोन वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याशिवाय, जबरदस्तीने काम करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 370 (मानव व्यापार), 342 (बेकायदेशीर कैद), 323 (मारहाण), 506 (धमकी) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा सहकारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पीडितांना पोलिस संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगार प्रथेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारचे प्रकरणे उघड करण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद Read More »

raj uddhavs historic reunion mns shiv sena ubt alliance for best patpedi elections

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण”

मुंबई | प्रतिनिधी –राज – उद्धव – महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवा अध्याय लिहिला जात असल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. दीर्घकाळाच्या वैचारिक व संघटनात्मक फाटाफुटीनंतर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – प्रथमच एकाच व्यासपीठावर आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘BEST पाटपेडी’ निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे. या अनपेक्षित निर्णयाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक असली तरी, ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन हा व्यापक राजकीय संकेत मानला जात आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या दोन दशकांत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांमध्ये अनेक चढउतार झाले. २००६ मध्ये शिवसेनेतून वेगळे होत राज ठाकरेंनी MNS स्थापन केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा आणि शब्दयुद्ध रंगत असे. त्यामुळे या निवडणुकीतली युती हा केवळ संघटनात्मक करार नसून, ‘जुन्या जखमांवर फुंकर घालण्याचा’ प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ‘BEST पाटपेडी’च्या निवडणुकीत या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “हा पहिला पाऊल आहे, पुढे मोठ्या निवडणुकीसाठीही आपण विचार करू,” असे दोन्ही नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी संकेत दिले आहेत. या युतीचे भविष्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय गोटांत रंगली आहे.

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण” Read More »

img 20250812 wa0001

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरु यांचे निधन; तृतीयपंथांच्या विविध प्रश्नासाठी लढणारा योद्धा गमावला

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजाचे जिल्हा अध्यक्ष व समाजकारणात सक्रीय असणारे काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून ते साईदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच तृतीयपंथी समाजासह विविध सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.काजल गुरु हे तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी व सन्मानासाठी आयुष्यभर झटणारे, निर्भीड नेतृत्व होते. व तृतीयपंथीयांसाठी दफनविधीसाठी जागा नव्हती तर काजल गुरु यांनी जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार करून जपून विधीसाठी जागा उपलब्ध करून घेतली व समाजातील तृतीयपंथींना आपले हक्काचे स्थान मिळावे, समाजात त्यांचा सन्मान वाढावा यासाठी त्यांनी असंख्य लढे उभारले. केवळ आंदोलनच नव्हे तर समाजातील सदस्यांच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तृतीयपंथी हक्क चळवळी यशस्वीरीत्या पार पडल्या.काजल गुरु यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक होते. ते फक्त तृतीयपंथी समाजापुरते मर्यादित न राहता, गरजू आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी पुढे असत. त्यांच्या निधनाने एक मोठे प्रेरणास्थान हरपल्याची भावना समाजात आहे.अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण याबाबत पुढील माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी सर्वच स्तरांतील लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत.

Kajal Guru Death : तृतीयपंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरु यांचे निधन; तृतीयपंथांच्या विविध प्रश्नासाठी लढणारा योद्धा गमावला Read More »

more money in your pocket; 2% dearness allowance increase for government employees

DA Hike – खिशात येणार जादा रक्कम; सरकारी कर्मचार्‍यांना २% महंगाई भत्ता वाढ

मुंबई | प्रतिनिधी –DA Hike – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा निर्णय घेतला आला आहे. महागाईच्या झळा सहन करत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता (DA) राज्य सरकारने तब्बल २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, हा लाभ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पगारात वाढीव भत्ता जमा होणार असून, कर्मचाऱ्यांच्या खिशात काहीशे रुपये जास्त येणार आहेत. वाढती बाजारपेठ, रोजचे वाढणारे खर्च आणि घरगुती गरजांचा ताण यामध्ये ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा ठरणार आहे. “सरकारने दिलेली ही छोटीशी का होईना, पण वेळेवर मिळालेली मदत आहे,” असे अनेक कर्मचारी संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या खजिन्यावर वार्षिक कोट्यवधी रुपयांचा भार पडणार असला तरी जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांत पेन्शनधारकांना दिलेल्या सुविधा, कर्जावरील सवलती यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर मिळालेला हा भत्तावाढीचा ‘गोड दिलासा’ नक्कीच स्मरणात राहील.

DA Hike – खिशात येणार जादा रक्कम; सरकारी कर्मचार्‍यांना २% महंगाई भत्ता वाढ Read More »