DNA मराठी

ताज्या बातम्या

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत  सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत या प्रकरणात मुदत वाढवली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात सुनावणीस आणखी वेळ लागेल यामुळे सर्वोच्च न्यायालयात  मुदत वाढवण्याची विनंती केली होती. जी आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.  तर आता या प्रकरणात निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत लागू शकते. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत आपल्यासमोर प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर अंतिम आदेश देण्यास  अध्यक्षांना सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली असून अजितदादांच्या सोबत असलेल्या पक्षाच्या आमदारांना तातडीने अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. या आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत शरद पवार गटाने त्यांचे विधानसभा सदस्यत्व लवकरात लवकर रद्द करण्यासाठी सभापतींकडे याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने  अध्यक्षांना फटकारले होते आणि अनुक्रमे 31 डिसेंबर आणि 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पुढील निवडणुकीपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.  मात्र, शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण झाली नसल्याचे सांगत नार्वेकर यांनी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण करण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि इतर 8 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्या गटात आहेत.

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल Read More »

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.  मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत ओबीसींना की मराठ्यांना फसवले? असं प्रश्न उपस्थित केला आहे. याचं बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी का? गेले नाही असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.   काय म्हणाले नाना पटोले? “आरक्षण देताना ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण नेमके कसे दिले याचा खुलासा राज्य सरकारने करावा, त्याचबरोबर सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते का दिले नाही असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा,” अशी मागणी सरकारकडे केली आहे. “जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले? याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल Read More »

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी….

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात मराठा आरक्षणासाठी मागणी होत होती. आज या मागणीला पुर्ण करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी…. Read More »

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही कडाक्याची थंडी अपेक्षित आहे. मुंबईतील सांताक्रूझ हवामान केंद्रात मंगळवार आणि बुधवारी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले. तर आज तापमान 17.8 अंशांवर घसरले. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील अनेकांनी स्वेटर आणि बोनफायरचा सहारा घेतला. पुण्यातही थंडीची तीव्रता वाढली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये आज पारा 7.4 अंशांवर घसरला. नागपूरचे तापमान 8.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. अवकाळी पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तविक, राज्यात अवकाळी पावसाचा धोका आहे. कोकणात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबई आणि कोकणात तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अलिबागमध्ये पारा 3.3 अंशांनी घसरला असून आजचे किमान तापमान 14.1 अंशांवर पोहोचले आहे. रत्नागिरीत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही परिस्थिती कायम आहे. थंडीचा कहर कायम राहणार आहे पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुके आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. राज्यात अनेक दिवसांपासून थंड वारे वाहत आहेत. थंडी आणि धुक्यामुळे हवाई आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नाशिकमध्ये 4.4 अंश तापमान नाशिकच्या निफाड तालुक्यात पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या हिवाळ्यात हे सर्वात कमी तापमान आहे. धुळे शहरात थंडीचा कहर सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यांतील तापमानात सातत्याने घसरण होत आहे.

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर Read More »

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसने नोकरभरती परीक्षेचा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तलाठी नियुक्तीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सुमारे 20 ते 25 युवक काँग्रेस कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुपारी 3.15 वाजता बोरिवलीकडे जाणारी ट्रेन थांबवली.

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण! Read More »

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Congress News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  तर दुसरीकडे ममता आणि भगवंत मान यांनी बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.  जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राजीव चंद्रशेखर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 7 महिन्यात काँग्रेसचा भ्रमनिरास वास्तविक, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न दिल्याच्या रागातून जगदीश शेट्टर यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गुरुवारी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर म्हणाले की, काही मुद्द्यांमुळे आपण काँग्रेसमध्ये गेलो होतो. पण, भाजपचे कार्यकर्ते त्यांना पक्षात परत येण्यासाठी सतत आग्रह करत होते, बीएस येडियुरप्पा, विजयेंद्र येडियुरप्पा आणि कर्नाटकचे भाजप नेतेही त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगत होते. त्यामुळे काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याबाबत बोलताना शेट्टर म्हणाले की, पक्षाने (भाजप) त्यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.  याआधी बीएस येडियुरप्पा आणि कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली.

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश Read More »

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या….

Gondia News:- गोंदिया शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री येथिल शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामा जवळ एका अज्ञात 38 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटणा मंगळवार – बुधवार च्या मध्यरात्री दरम्यान समोर आली आहे.  या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी दोन संशयिताना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र हत्या कोणत्या वादावरून करण्यात आली आहे. हे अद्याप कळू शकले नसुन हत्या झालेल्या युवकाची ओळखही अद्यापपर्यंत पटू शकली नाही.  या घटनेचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे.

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या…. Read More »

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू

 Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. रात्री अडीचच्या सुमारास एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरसह तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एसटी बस आणि इको कार यांच्यात धडक झाली. रात्री अडीच वाजता धवलपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला, त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.  दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ जाम झाला होता. निलेश रावसाहेब भोर, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी, प्रकाश रावसाहेब थोरात, सचिन कांतीलाल मंडलीचा, अशोक चीमा केदार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात सुयोग अडसूळ नावाचा तरुण जखमी झाला आहे. अपघातातील उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगरमधील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू Read More »

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय

Loksabha Election 2024 : देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सत्ताधारी पक्ष भाजपसह इतर पक्ष देखील जागावाटपाबाबत चर्चा करत आहे.  यातच राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा येत्या काही दिवसात सुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या राज्याची राजधानी मुंबईमध्ये जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार गट), शिवसेना( ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. याच बरोबर बैठकीसाठी डाव्या पक्षांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत उद्या मतदारसंघनिहाय चर्चा होणार असून जर काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.  तर चर्चांवर विश्वास ठेवला तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालं आहे. तर उद्या राहिलेल्या 18 जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे. तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय Read More »

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »