DNA मराठी

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीम ने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणी मधून आणि निर्मिती मधून राज्याच्या पुढे येतोय अस देखील गोवर्धन दोलताडे बोलले , मला या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही , उलट मला आनंद होईल की ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय , सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी  या अनुषंगाने महाराष्ट्रा मधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा , त्याचबरोबर ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय , भरभरून शो वाढत आहेत , प्रेक्षकांन कडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे बोलले , संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल अस वाटते , त्यांच बरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत , या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल यांचं गोष्टी साठी बनवलेला आहे असं अभिनेता रोहन पाटील यांनी मत व्यक्त केलं , यावेळी पत्रकार परिषद ला सह निर्माते रामदास एकनाथ मेदगे , जान्हवी मनोज तांबे , विठ्ठल अर्जुन पचपिंड , नितीन लोहोकरे व सर्वच चित्रपटाची टीम उपस्थित होती , चित्रपटाचा संपूर्ण नफा समाजा साठी जाहीर केला जातोय हा खूप धडाडीचा  निर्णय वाटतो , त्यामुळे चित्रपटाची जास्तच चर्चा वाढत चालली आहे असं दिसत आहे.

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा Read More »

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, पाच वेळा आमदारांने सोडला पक्ष

Assembly Election 2024 : ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह  हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस आमदार किरण चौधरी आणि त्यांची कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना दिल्ली गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत. किरण चौधरी मुलगी श्रुती चौधरी यांना भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट मागत होत्या, पण पक्षाने त्यांच्या जागी महेंद्रगडमधून काँग्रेसचे आमदार राव दान सिंह यांना तिकीट दिले, त्यामुळे किरण चौधरी नाराज झाले होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.  बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल देखील उपस्थित राहू शकतात. काँग्रेस अध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात किरण चौधरी म्हणाल्या, “मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी चार दशकांपासून काँग्रेसचा एकनिष्ठ सदस्य आहे. मी माझे जीवन पक्ष आणि लोकांसाठी समर्पित केले आहे. हरियाणात, मी दिवंगत बन्सीलाल लाल आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार दिवंगत पती सुरेंद्र सिंग यांच्या वारशाचे देखील प्रतिनिधित्व करते. मात्र, माझ्यासारख्या प्रामाणिक आवाजाला जागा न देता हरियाणात काँग्रेस पक्षाचा कारभार अतिशय नियोजनबद्ध आणि पद्धतशीरपणे दडपून टाकला जात आहे. “ अपमान सहन करण्याची मर्यादा असते- श्रुती चौधरी आपल्या राजीनामा पत्रात श्रुती चौधरी यांनी लिहिले की, “हरयाणातील काँग्रेस पक्ष दुर्दैवाने व्यक्तीकेंद्रित झाला आहे ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या हिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे जेणेकरून मी माझ्या लोकांचे हित आणि मी ज्या मूल्यांसाठी उभी आहे ते जपता येईल. अपमान सहन करण्याची मर्यादा असते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हरियाणामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि यावेळी सलग दोनवेळा दहा जागा जिंकणाऱ्या भाजपची बरोबरी केली होती, परंतु विधानसभेच्या आधी निवडणुकीच्या निमित्ताने आता पक्षांतर्गत वाद सूरु झाला आहे.

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, पाच वेळा आमदारांने सोडला पक्ष Read More »

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी

Vasai Murder Case : वसई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खडबड उडाली असून अनेक चर्चांना उधाण आला आहे.  शहरात भरदिवसा रस्त्याच्या मधोमध 20 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आरती यादवचे नुकतेच आरोपी रोहित यादवसोबत ब्रेकअप केला होता. याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. 30 सेकंदात 15 वार  पोलिसांनी सांगितले की, वसईमध्ये एका नराधमाने प्रेयसीच्या डोक्यावर अवघ्या 30 सेकंदात लोखंडी कुंड्याने 15 वेळा वार करून रस्त्यातच तिची निर्घृण हत्या केली. ही घटना वसई (पूर्व) येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी 9.45 वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रोहितने आरतीवर मागून मोठ्या लोखंडी रेंचने हल्ला केला. त्यामुळे आरती रस्त्यावर पडते. यानंतर रोहित तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर हल्ला करतो. …तर आरतीचा जीव वाचला असता घटनेच्या वेळी डझनभर लोक तेथून गेले, परंतु सर्वजण केवळ प्रेक्षक राहिले. एका प्रत्यक्षदर्शीने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे तो घाबरला आणि मागे हटला. तोपर्यंत घटनास्थळी लोकांची गर्दी जमली असली मात्र तरी देखील 20 वर्षीय आरती यादवला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर आरतीचा जीव वाचू शकला असता, असे पोलिसांनी सांगितले. आरतीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली होती. आरती ही उत्तर प्रदेशची रहिवासी होती आणि आरोपी रोहित हा हरियाणाचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी (18 जून) सकाळी आरती वसईतील एका खासगी कंपनीत कामासाठी घरून निघाली. त्यानंतर रोहित तिथे आला आणि तिला विचारू लागला की तिचे कोणत्या मुलासोबत अफेअर आहे. यानंतर आरती निघू लागली असता रोहितने हातातील मोठ्या कुंड्याने तिच्या डोक्यात वारंवार वार केले. रोहित आरतीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ बसून राहिला. काही वेळाने वालीव पोलिसांनी येऊन त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. हल्ला करताना रोहित म्हणत होता, “तू माझ्याशी असं का केलंस?” आरोपींनी आरती यादव यांच्यावर इंडस्ट्रियल कुंड्याने सुमारे 15 वार केले. आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपीने त्याला हे काम मिळवून दिल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि आरती गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रोहितला अचानक संशय आला की ती आपली फसवणूक करत आहे आणि ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यावरून दोघांमध्ये अनेक भांडण झाले आणि अखेर आरतीचे ब्रेकअप झाले. याचा राग आल्याने रोहितने आरतीची हत्या केली. पोलिसांनी कारवाई केली नाही : आरतीची बहीण मृत आरती यादवची बहीण सानिया यादव हिने आरोप केला आहे की, रोहित गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या बहिणीचा छळ करत होता. शनिवारी त्यांनी आरतीला मारहाण केली होती. आरतीचा मोबाईल तुटला. सानियाने सांगितले की, कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी रोहितवर कारवाई करण्याऐवजी त्याला इशारा देऊन सोडून दिले. तिची बहीण आरती यादवला न्याय मिळवून देणार असल्याचे सानियाने सांगितले. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी Read More »

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा 

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असून लवकरच शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राऊत मुंबईत कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार 3 महिन्यात बदलणार आहे. यासोबतच नव्या सरकारचे शिल्पकार उद्धव ठाकरे असतील, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या नेत्यांशी विचारमंथन केले. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकामुळे राज्यात राजकीय वातावरण तापला आहे. महाविकास आघाडीकडून तीन जागांवर ठाकरे गट तर एक जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला आहे.  काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील आगामी एमएलसी निवडणुकीसाठी शिवसेनेने (यूबीटी) उमेदवारांच्या घोषणेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने उद्धव सेनेला आपल्या उमेदवारांची नावे मागे घेण्यास सांगितले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीच्या  साथीदारांशी चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार ठरवला.  घटक पक्षांशी चर्चा करूनच उमेदवार आणि जागा निश्चित होतील, अशी आम्हाला आशा होती. मात्र, नंतर परस्पर संमतीने दोघांमध्ये जागा वाटून घेण्यात आल्या. उद्धव यांचे उमेदवार तीन जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा  Read More »

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद

Kathua Encounter : कठुआमध्ये सुरू असलेल्या चकमकीत CRPF चा एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  कबीर दास असे या शहीद जवानाचे नाव आहे.  मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी यापूर्वीच ठार झाला आहे. कठुआ हिरानगरच्या सोहल गावात झालेल्या या चकमकीत एक नागरिकही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंजाब जम्मू सीमा सील कठुआ ऑपरेशन लक्षात घेऊन भारतीय लष्कराने जम्मू पठाणकोट सीमा रस्त्याचा ताबा घेतला आहे. यावेळी प्रत्येक वाहनाची तपासणी करून पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. सध्या जम्मू भागात सर्व प्रकारे हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. दोडामध्ये पाच जवान जखमी, जैशने घेतली जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची आघाडी असलेल्या काश्मीर टायगर्सने डोडा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून निष्क्रिय होती. अचानक याने दोडामध्ये सक्रियता दाखवली आहे. सध्या दोडामध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाचे पाच जवान आणि एक एसपीओ जखमी झाले आहे.

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद Read More »

PM Kisan Samman Nidhi Yojna : सावधान, ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका पीएम किसान योजनेसाठी अर्ज, नाहीतर…

PM Kisan Samman Nidhi Yojna : शेतकऱ्यांना आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान योजना राबवत आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 10 जून रोजी देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी केला आहे. देशातील शेतकरी अनेक दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहत होते. पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे? पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे, ही योजना विशेषतः गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे. नियमांनुसार, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये दिले जातात, ज्यामध्ये दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना काही नियमांची पूर्तता करावी लागते. अशा परिस्थितीत या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास सरकार अशा लोकांवर कारवाई करू शकते. या शेतकऱ्यांवर शासन कारवाई करणार आहे बनावट कागदपत्रांचा वापर करून या योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांवर भारत सरकार आता कारवाई करत आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यामुळे सरकारला हजारो कोटींचे नुकसान होत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गतही अनेकजण बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेत फसवणूक करत आहेत. त्यामुळे आता अशा लोकांवर सरकारकडून वसुली केली जाणार असून अशा लोकांवर कारवाईही केली जाणार आहे. जर कोणी योजनेचे नियम पूर्ण करत नसेल तर त्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करू नये. कोण अर्ज करू शकत नाही? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी. असे झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याशिवाय जर कोणी आयकर अंतर्गत येत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. किंवा शेतकऱ्याने अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा इतर कोणतेही काम केले तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Kisan Samman Nidhi Yojna : सावधान, ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका पीएम किसान योजनेसाठी अर्ज, नाहीतर… Read More »

Gold Smuggling : मुंबईत 19 कोटी रुपयांची सोन्याची तस्करी, तब्बल 33 किलो सोने जप्त

Gold Smuggling: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 19 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी उधळून लावली आहे. या प्रकरणात दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.  माहितीनुसार, नैरोबीमधील दोन महिलांना 19.15 कोटी रुपयांच्या 32.79 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी त्यांच्या अंडरगारमेंट्स आणि सामानात तस्करीचे सोने लपवले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन महिलांना स्वतंत्रपणे पकडण्यात आले आहे, जरी दोन्ही एकाच सोन्याच्या तस्करी सिंडिकेटचा भाग आहेत. पहिल्या प्रकरणात, अधिकाऱ्यांनी अंजल अब्दी काला (26) चा शोध घेतला असता, त्यांना तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये 8 तोळे सोने आणि एका पिशवीत चार पाउचमध्ये टेपमध्ये गुंडाळलेले 20 तोळे सोने सापडले. 28 तोळे सोन्याचे वजन 11.308 किलो असून त्याची किंमत 6.60 कोटी रुपये आहे. त्यानंतर त्याच फ्लाइटमधून आलेल्या सईदा हुसेन (24) या अन्य महिला प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता, चतुराईने लपवून ठेवलेले 61 तोळे सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन 21.48 किलो असून त्याची किंमत 12.54 कोटी रुपये आहे. दोन्ही परदेशी महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्याला कस्टम कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. काय म्हणाल्या आरोपी महिला? काला यांचे वकील प्रभाकर त्रिपाठी म्हणाले, अंजल काला आठ महिन्यांची गर्भवती आहे. त्याला फ्रेम करण्यात आले आहे. सईदा हुसैनने त्याच्याकडे सामान नेण्यासाठी मदत मागितली होती आणि त्याच्या मदतीमुळे ती अडकली. ताब्यात घेतलेल्या सोन्याशी त्याचा काहीही संबंध नाही. दरम्यान, सईदाचे वकील विजय अडवाणी यांनी दावा केला आहे की, तिला खोटे गोवण्यात आले आहे. सुरुवातीच्या चौकशीत दोघांनीही सोनं आपलं म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींना हे सोने कोणी पुरवले आणि मुंबईत ते कोणाकडे पोहोचवले जाणार होते, याचा तपास अधिकारी करत आहेत.

Gold Smuggling : मुंबईत 19 कोटी रुपयांची सोन्याची तस्करी, तब्बल 33 किलो सोने जप्त Read More »