DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. त्यामुळे संदीप कोतकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा नगरच्या राजकारणात होत आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात मोठा जल्लोष करण्यात आला. माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे. कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संदीप कोतकर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावे लागेल.

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण Read More »

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.   निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.    अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Rain Alert:  गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागात मंगळवारी अधूनमधून पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्पष्ट, कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले असून त्याचे नैराश्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देखभालीमुळे चेन्नईतील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचले नसून पडलेली झाडे तातडीने हटवण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आंध्रमध्ये मुसळधार पाऊस, चक्रीवादळाची भीती दुसरीकडे, आंध्र प्रदेशसह अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातील दबाव चक्री वादळात बदलला आहे, जो 10 किमी / तासाच्या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. हे चेन्नईपासून 440 किमी, पुडुचेरीपासून 460 किमी आणि नेल्लोरपासून 530 किमी अंतरावर आहे. उद्या सकाळपर्यंत हे वादळ पुद्दुचेरी आणि नेल्लोरच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रायलसीमा येथे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर 40-60 किमी/ताशी वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कर्नाटकात मुसळधार पाऊस, बचाव पथके सज्ज त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर, बेंगळुरूमध्ये आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात बेंगळुरू शहरात 66.1 मिमी पाऊस झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगळुरू शहरी जिल्ह्यातील शाळा बुधवारी बंद राहतील, तर अनेक माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि कर्नाटक राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 60 कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. “कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी आम्ही आणखी 40 कर्मचारी पुन्हा तैनात करत आहोत,” असं ते म्हणाले. 

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत कारवाई विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त् केला आहे.  पोलीस अधिक्षक  राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे  विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी इसम हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती.  पो.नि किरण शिंदे , यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितल्याने लागलीच पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा इसम  शैलेंद्र सुखदेव बोरगे (वय-52 वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर) यास सुझुकी कंपनीची कारसह ताब्यात घेतले. आरोपीकडून 5,00,000 रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कार व 2,75,460 रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण 7,75,460 रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  पोकों संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा  दारुबंदी का.क.65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त Read More »

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा

Maharashtra Election: केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.  महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही राज्यात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळविले, मात्र अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेने युती सोडली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची नवी युती केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले होते. परंतु 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. झारखंड निवडणूक पाचव्या झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये झाल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या युतीने हेमंत सोरेन मुख्यमंत्री बनून राज्य सरकार स्थापन केले. यावेळीही ही युती एकत्र असून सर्व 81 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI शिष्टमंडळाने 24 सप्टेंबर रोजी रांची येथे झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेतला, केंद्र आणि राज्य संस्थांना निधीचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले. 2019 च्या निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान झाले, तर महाराष्ट्रात फक्त एकाच टप्प्यात मतदान झाले.

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा Read More »