DNA मराठी

ट्रेंडिंग

fb img 1763353276214

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण

Ahilyanagar News: चार वर्षे चालत आलेल्या शेतरस्त्याच्या वादाला शेवटी तोडगा निघाला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढत रस्ता खुला करण्यात आला. तहसीलदारांच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असतानाच मंडळाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने फेरपालटाने जमिनींची अचूक माहिती समोर आली, त्यातून वादी–प्रतिवादींमध्ये सामंजस्य घडून आले. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने झाडी-झुडपे हटवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त चार तासांत रस्ता खुला झाला. महसूल अधिकाऱ्यांनीही या सकारात्मक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. एकजुटीने काम केल्यास कोणतेही आव्हान सोपे होते, याचे उत्तम उदाहरण. चर्चेत सहभागी असणारे भाऊसाहेब मतकर, विक्रम मतकर, नारायण मतकर, सुरेश मतकर, राजेश मतकर, वसंत मतकर, रेवजी कराळे, कमलाकर जाधव, संदीप जाधव, म्हातारदेव जाधव, आदिनाथ जाधव, हरिश्चंद्र मतकर, रमेश मतकर, जैनोद्दीन शेख, मन्सूर शेख, पोपटराव कराळे (संचालक, खरेदी-विक्री संघ) आदी

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण Read More »

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane on Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधी यांचा पार्ट टाइम राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं असं देखील नितेश राणे म्हणाले.   तर दुसरीकडे हिंमत असेल तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात Read More »

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar on Pune land Case :   पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खाजगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा सुनियोजित कट होता.या  गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून वडेट्टीवर यांनी मागणी केली. या प्रकरणातील गंभीर बाबी म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन ‘वनस्पती सर्वेक्षण विभाग’ यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ३० डिसेंबर २०२४ रोजी  शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम ‘जमीन धारकत्व मूल्य’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले  आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी  शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

office romance

Office Romance : काय सांगता? ऑफिस रोमान्समध्ये भारतीय दुसऱ्या नंबरवर सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

Office Romance: ऑफिस रोमांसमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा धक्कादायक खुलासा एका नवीन सर्वेक्षणातून झाला आहे. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण व्यावसायिक जीवनात, ऑफिस हे फक्त काम करण्याचे ठिकाण राहिलेले नाही. दररोज तासनतास एकत्र काम केल्याने सहकाऱ्यांमध्ये भावनिक बंध निर्माण होणे सामान्य होत आहे. कधीकधी, ही नैसर्गिक जवळीक कालांतराने मैत्रीपासून प्रेमसंबंधांपर्यंत वाढू शकते. एकूण 11 देशांतील लोकांचा अभ्यास अ‍ॅशले मेडिसेलने केलेल्या अलीकडील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, ऑफिस रोमान्सच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासात अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह 11 देशांतील लोकांचा समावेश होता. अहवालातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की 40 टक्के भारतीय कर्मचारी, किंवा 40 टक्के, कधी ना कधी सहकाऱ्यासोबत संबंधात होते. मेक्सिको या यादीत अव्वल आहे, 43 टक्के लोक ऑफिस अफेअरची तक्रार करतात. त्यानंतर भारत येतो. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये ही संख्या सुमारे 30 टक्के आहे. या अहवालात असेही दिसून आले आहे की महिलांपेक्षा पुरुष सहकाऱ्याशी डेट करण्याची शक्यता जास्त असते. 51 टक्के पुरुषांनी सहकाऱ्याशी संबंध असल्याचे मान्य केले, तर महिलांसाठी हे प्रमाण 36 टक्के होते. महिलांमध्ये करिअरची खबरदारी महिला करिअरबाबत अधिक जागरूक होत्या. सुमारे 29 टक्के महिलांनी सांगितले की त्यांना ऑफिस रोमान्समध्ये सहभागी होण्यास कचरतात कारण त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरुषांसाठी हा आकडा 27 टक्के होता. उल्लेखनीय म्हणजे, 18 ते 24 वयोगटातील तरुण कर्मचारी ऑफिसच्या बाबींबाबत सर्वात जास्त सावध असल्याचे दिसून आले. त्यांना भीती आहे की अशा नात्यांमुळे त्यांचे करिअर खराब होऊ शकते. ऑफिस रोमान्समध्ये भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान हे केवळ बदलत्या नातेसंबंधांचे लक्षण नाही तर सामाजिक दृष्टिकोनातील बदल देखील दर्शवते. पारंपारिक नातेसंबंधांसोबतच, भारतातील लोक खुल्या नातेसंबंधांसारख्या संकल्पनांबद्दलच्या त्यांच्या धारणा देखील बदलल्या आहेत. ग्लीडेन या डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणानुसार, देशातील 35 टक्के लोक खुल्या नातेसंबंधांमध्ये आहेत, तर 41 टक्के लोक अशा व्यवस्थेचा विचार करतील.

Office Romance : काय सांगता? ऑफिस रोमान्समध्ये भारतीय दुसऱ्या नंबरवर सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा Read More »

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

Pratap Sarnaik : ST चे उत्पन्न वाढणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ‘पंचसूत्री’ प्लॅन तयार

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज एसटी स्वतःला ‘चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी १० वाजता आगारात, ११ ला विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा मंत्र या बैठकींना दिला आहे. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे. चालक–वाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे – कार्यक्षमतेवर भर डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे KPTL (किलोमीटर प्रति १० लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे. तिकीट विक्री ही महसुलाची जीवनवाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM(संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज — सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल. ‘प्रवासी देवो भव’ – सुविधांचा दर्जा उंचावणार स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत. एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मत यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. १ जानेवारीला बसस्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाईल. वक्तशीरपणा आणि नियमितता ही एसटीची नवी ओळख बनवण्याचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८०% पेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे— अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात होत आहेत. यासोबतच ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.

Pratap Sarnaik : ST चे उत्पन्न वाढणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ‘पंचसूत्री’ प्लॅन तयार Read More »

sunny deol

Sunny Deol on Media: लाज वाटत नाही का? सनी देओल मीडियावर भडकला

Sunny Deol on Media: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत अनेक दावे करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबाने मीडिया आणि जनतेकडून गोपनीयतेची विनंती केली आहे मात्र तरी देखील सोशल मीडियावर अनेक दावे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत करण्यात येत असल्याने आज अभिनेता सनी देओल मीडियावर भडकला. सनी देओलचा पापाराझींवर राग सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ त्याच्या घराबाहेरचा आहे. सनी देओल त्याच्या घराबाहेर असलेल्या पापाराझीला (फोटो जर्नलिस्ट) पाहताच त्याचा राग भडकला. सनी देओल म्हणतो, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे… तुमच्या घरात आई-वडील आणि मुले आहेत… तुम्ही चु*** असे व्हिडिओ बनवत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का?” सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काय म्हटले? सनी देओलच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “सनी देओलने योग्य काम केले.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सनी देओलचा राग योग्य आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सर, माझ्याकडून त्याला आणखी दोन शिव्या द्या.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “पाजी अगदी बरोबर आहेत.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “भाऊ, त्याला एकटे सोडा, त्याचे वडील बरे नाहीत.” 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या धर्मेंद्रला 13 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देऊन घरी आणण्यात आले. कुटुंबाकडून अधिकृत निवेदनात म्हटले आहे की धर्मेंद्रची घरीच काळजी घेण्यात येत आहे. कुटुंबाने मीडिया आणि जनतेला त्याला गोपनीयता देण्याची विनंतीही केली.

Sunny Deol on Media: लाज वाटत नाही का? सनी देओल मीडियावर भडकला Read More »

img 20251113 wa0010

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला

Leopard Attack: अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात काल (१२ नोव्हेंबर) सायंकाळी बिबट्याने पाच वर्षांच्या रीयंका पवार हिला उचलून नेले होते. तब्बल १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी काटवण परिसरात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला आणि गावात शोककळा पसरली मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा राग अनावर झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेत ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला पकडत नाही किंवा ठार मारत नाही, तोपर्यंत रीयंका पवार हिचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वेळीच पिंजरे लावले असते तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावात वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस व वनविभागाचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून गाव सुरक्षित नाही, बिबट्याला ठार मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला Read More »

valu

Maharashtra Government: नवीन वाळू धोरणाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; पहिल्या टप्प्यातील लिलावासाठी 107 अर्ज

Maharashtra Government : जिल्ह्यातील मुळा व सीना नदीपात्रातील १२ वाळू घाटांचा ई-लिलाव पहिल्या टप्प्यात सुरू आहे. नवीन वाळू धोरणाला ठेकेदारांकडून मोठा प्रतिसाद मिळून १०७ अर्ज प्राप्त, तर त्यातील ६० प्रस्ताव विविध नाहरकत प्रमाणपत्रासाठी तालुका पातळीवर पाठवण्यात आले आहेत. नवीन वाळू धोरणातील महत्त्वाचे बदल २०२५ मधील अध्यादेशानुसार प्रति ब्रास ₹६०० स्वामित्व धन (रॉयल्टी) लिलावासाठी वाळू साठ्याच्या २५% अनामत रक्कम अनिवार्य पहिल्या टप्प्यात १२ घाटांचे लिलाव सुरू कृत्रिम वाळू धोरण राज्यात मंजूर कृत्रिम वाळू धोरणानुसार जिल्ह्यात डेपो उभारणीसाठी प्रस्ताव मागवले गेले होते. १४ तालुक्यांतून आलेल्या प्रस्तावांपैकी ६० पात्र ठरले आणि तेही विविध एनओसीसाठी तालुका पातळीवर पाठवले आहेत. ही एनओसी मिळाल्यानंतरच इच्छुकांना कृत्रिम वाळू डेपो सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील घाट व उपलब्ध साठा (ब्रासमध्ये) सीना – नागलवाडी (कर्जत) : ८,३९२ मुळा – तास (पारनेर) : ३,८८७ / ३,७१० मुळा – पळशी (पारनेर) : ३,१८० / २,५४४ मुळा – मांडवे खुर्द (पारनेर) : २,१२० मुळा – देसवडे (पारनेर) : १,९०८ / १,९०८ / २,२२३ प्रवरा – जातप (राहुरी) : ७,१५५ देवनदी – देसवंडी (राहुरी) : ७,४२० एनओसी अनिवार्य कृत्रिम वाळू डेपो सुरू करण्यासाठी खालील नाहरकत प्रमाणपत्रे आवश्यक: ग्रामसभेचा ठराव नगररचना विभागाचे प्रमाणपत्र भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र संबंधित जमिनीचा उतारा नवीन वाळू धोरणामुळे जिल्ह्यातील नदीपात्र वाळू उपसा आणि कृत्रिम वाळू साठ्यांची प्रक्रिया प्रशासनिकदृष्ट्या अधिक पारदर्शक व नियंत्रित होत असून ठेकेदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Maharashtra Government: नवीन वाळू धोरणाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; पहिल्या टप्प्यातील लिलावासाठी 107 अर्ज Read More »

supriya sule

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule: तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक आता चारही बाजूने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे. असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »