DNA मराठी

शेती

Ahmednagar News: किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना  झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्‍यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.  दहा वर्षांच्‍या काळात कृषि क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनविण्‍याचे काम केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून झाले आहे. कृषि क्षेत्रासाठी घेतलेल्‍या प्रत्‍येक निर्णयाचा लाभ शेतक-यांना होत आहे. किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्‍याचा निर्णय झाला. मागील पाच वर्षे ही योजना अखंडीत सुरु आहे. जिल्‍ह्यातील २ लाख ८२ हजार ३७९ शेतक-यांना ५६ कोटी ४७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.   या बरोबरीनेच खंतांच्‍या किमती कमी करण्‍यासाठी केंद्र सरकारने अनुदानाची उपलब्‍धता करुन दिली. शेती विषयक ज्ञान शेतक-यांना एकाच छत्राखाली मिळावे यासाठी किसान समृध्दी केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आल्‍याचे सांगून ते म्‍हणाले की, नैसर्गिक आपत्‍तीमध्‍येही केंद्र आणि राज्‍य सरकार शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहे.  अतिवृष्‍टीमध्‍ये नुकसान झालेल्‍या मतदार संघातलील ३ लाख २५ हजार २८६ शेतक-यांना ३६५ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्‍यात आली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.  सहकार मंत्रालय स्‍थापन करुन, केंद्र सरकारने एैतिहासिक निर्णय घेतला. हे मंत्रालय सुरु झाल्‍यानंतर सहकारी साखर कारखान्‍यांवर वर्षानुवर्षे लादण्‍यात आलेला आयकराचा बोजा कमी करण्‍याचा निर्णय झाल्‍यामुळेच राज्‍यातील आणि जिल्‍ह्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकून आहे. केंद्र सरकारने ऊसाच्‍या हमीभावातही सातत्‍याने वाढ केली.   ग्रामीण भागाच्‍या अर्थकारणाला सहाय्यभूत ठरणा-या प्राथमिक सोसायट्यांना सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून आता नवी ओळख निर्माण करुन देण्‍याचे काम होत असून, धान्‍य गोदामांची उभारणी करण्‍यासाठीही प्राथमिक सोसायट्यांना सहकार्य करण्‍याची भूमीका तसेच प्रमुख पीकांकरीता हमीभावाची शाश्‍वती देताना अन्‍य २२ उत्‍पादीत पिकांनाही हमीभाव देण्‍याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्‍प पत्राच्‍या माध्‍यमातून दिली असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना Read More »

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान

Ahmednagar News: राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतकऱ्यांनाच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत.  राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे निर्माण होत होते. दूग्‍ध व्‍यवसाय व पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात मोठी मदत झाली. जिल्‍ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असल्‍याची माहीती विभागाच्‍या वतीने देण्‍यात आली.  अकोले तालुक्‍यातील २ हजार ७२५ शेतकऱ्यांना १५ कोटी २४ लाख ९६ हजार, संगमनेर तालुक्‍यातील १७ हजार ११९ शेतक-यांना १२ कोटी १० लाख ६३ हजार, कोपरगाव तालुक्‍यातील ७ हजार ९२ शेतकऱ्यांना ५ कोटी १६ लाख १२ हजार, राहाता तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतक-यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार, श्रीरामपूर तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार, नगर तालुक्‍यातील २ हजार १३८ शेतक-यांना २१ कोटी ५५ लाख ७ हजार, नेवासा तालुक्‍यातील ४ हजार ६८ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पारनेरमध्‍ये ५ हजार ८१४ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पाथर्डी तालुक्‍यातील २७८ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख ३४ हजार, राहुरी तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार एवढे अनुदान प्राप्‍त झाले आहे.   जिल्‍ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्‍ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकऱ्यांची माहीती विभागाने संकलित केली असून, हे दूध उत्‍पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्‍हणून, त्‍यांनाही अनुदनाचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांची संख्‍या ही २९ हजार ४४१ असून, या शेतकऱ्यांना ५ कोटी २३ लाख ६६ हजार ९१५ रुपयांचे अनुदान मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये यासाठी विभागाने १५ एप्रिल पर्यंत मुदत वाढविली असल्‍याचेही विभागाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान Read More »

Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी

Weather Update : राज्यात आता उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. राज्यातील बहूतेक ठिकाणी आता कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला आहे.  जे सामान्यपेक्षा काही अंशांनी जास्त आहे. तर कडक उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने  या उन्हाळी हंगामात उष्णतेच्या लाटेसह तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात सध्या तीव्र उष्णतेचे कारण म्हणजे उत्तर-पश्चिम भारतातील उष्ण प्रदेशातून येणारी हवा आणि महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरात तयार झालेले अँटी-सायक्लोनिक परिचलन. १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रात उष्माघाताची 41 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी २८ पैकी सर्वाधिक प्रकरणे गेल्या पंधरवड्यात आढळून आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात उष्माघाताचे सर्वाधिक पाच, तर कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी ४ बळी गेले आहेत. तर पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये दुपारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. गुरुवारी बीडचे कमाल तापमान ४०.३ अंश, जळगाव ४०.६ अंश, जेऊर ४२ अंश, मालेगाव ४२ अंश, मोहोळ ४१.१ अंश, नांदेड ४१.२ अंश, धाराशिव ४१.२ अंश, परभणी ४१.७ अंश, सांगली ४०.४ अंश, सोहळे ४० अंश सेल्सिअस होते. रेकॉर्ड केले.

Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी Read More »

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबवत आहे.  या योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात.  ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हा लाभ उपलब्ध आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी हस्तांतरणाद्वारे पाठवले जातात.आतापर्यंत 16वा हप्ता जाहीर झाला होता आणि आता 17वा हप्ता जारी होणार आहे.   17 वा हप्ता कधी येणार? पीएम योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो.  दुसऱ्या शब्दांत, आता 17 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान जारी केला जाईल. एप्रिल ते जून दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्याने आणि आचारसंहिता लागू असल्याने पुढील हप्ता जून महिन्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे, कारण निकाल 4 जूनला जाहीर होणार असला तरी अद्याप अधिकृतपणे पुष्टी करणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना  लाभ मिळणार    या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले आहे आणि जमीन पडताळणी eKYC सह केली आहे. eKYC करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रात किंवा बँकेत देखील जाऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. eKYC कसे करावे? पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि फार्मर कॉर्नर अंतर्गत ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक द्या, हा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो सबमिट करा. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला देखील भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही OTP आधारित eKYC करून घेऊ शकता. जर तुम्हाला पोर्टल किंवा CSC केंद्राद्वारे ई-केवायसी करता येत नसेल, तर तुम्ही बँकेत जाऊनही हे काम करून घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. यादीत तुमचे नाव तपासा सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (https://pmkisan.gov.in/) आणि पोर्टलवर दर्शविणारी आपली स्थिती जाणून घ्या हा पर्याय निवडा. येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका, तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला तुमची स्थिती कळेल. तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. लाभार्थी यादी डाऊनलोड करून, तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे हे तुम्ही पाहू शकता.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये Read More »

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये

PM Kisan Samman Nidhi: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.  मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी समोर आली आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. होय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासोबतच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे दुप्पट पैसेही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 6000 रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीसोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे वितरण करतील. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्राकडून मिळून 6000 रुपये मिळतील. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच आज राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार लिंक बँक खात्यात 6,000 रुपये थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजना काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी आणखी 6,000 रुपये दिले जातील.  राज्यातील शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दरवर्षी हप्त्याने मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये पाठवले जातील.

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये Read More »

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे. अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.  टरबूज, संत्रा, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी  पावसासह काही भागात गारपीट झाली आहे. राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.  तरी यांकडे अकोला जिल्हाअधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ज्वारी,कादा संञा, या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा, कादा काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लोहारा ,कवठा,बहादूरा, निंबा, हाता,जानोरी,वझेगाव, अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी Read More »

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

Sujay Vikhe News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.  या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.  या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने  कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.  या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे,  हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी  उपस्थित होते. यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.  यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र  विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही  कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.  माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी  मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे. येथे हवामान कसे असेल? IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.   सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो. इथे मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली..

Sujay Vikhe :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.  यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती.   केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. Read More »

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट

Amit Shah: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत.  मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.  तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा  यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली. यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे. दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.  विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.  अशात खा.सुजय विखेंच्या  पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट Read More »