DNA मराठी

मनोरंजन

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता. सैफवर हल्ला कसा झाला?सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले. पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा Read More »

घरात चोरी अन् Saif Ali Khan वर चाकूने वार, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात अभिनेता सैफ जखमी झाला आणि त्याला मध्यरात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सैफवर सहा वेळा चाकूने हल्ला झाला आणि त्याच्या शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. लीलावती रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफला दोन ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या मणक्याजवळही दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सैफ अली खानवर हल्ला का झाला?मीडिया रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सुरुवातीला असे म्हटले जात होते की चोरीच्या उद्देशाने एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली होती, परंतु नंतर वेगळीच माहिती समोर आली. ताज्या वृत्तांनुसार, पहाटे 2 वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला आणि त्यांच्या घरातील मोलकरणीशी वाद घालत होता. जेव्हा सैफ दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी आला तेव्हा त्या माणसाने सैफचे काहीही ऐकले नाही आणि अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो माणूस पळून गेला आणि सैफ जखमी झाला. लीलावती रुग्णालयात दाखल हल्ल्यानंतर, सैफ अली खानला दुपारी 3.30 च्या सुमारास मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर लगेच उपचार केले. लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी म्हणाले की, सैफला सहा ठिकाणी दुखापत झाली आहे. पाठीच्या कण्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. डॉ. उत्तममणी म्हणतात की सैफवर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्याची प्रकृती ठीक आहे. वांद्रे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच वेळी, मोलकरणीची चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे.

घरात चोरी अन् Saif Ali Khan वर चाकूने वार, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट Read More »

Prasad Oak : दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर !

Prasad Oak : मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन गेले आणि नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे ! ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव ” बाबुराव पेंटर “ मराठी सिनमांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट होताना दिसतात आणि आता अश्या एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय ही मराठी सिनेमा विश्वा साठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या बद्दल बोलताना प्रसाद सांगतो ” बाबुराव पेंटर यांच्या जीवनाराव आधारित भव्य कलाकृती निर्माण होत आहे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी झटून काम करत आहेत. दिग्गज बाबुराव पेंटर यांची भूमिका मला साकारायला मिळणं हा श्री नटराजा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे” आता या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार कधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार काय गोष्ट असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 2025 वर्षात प्रसाद ओक अनेक चित्रपट करणार असून आता या चित्रपटासाठी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Prasad Oak : दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर ! Read More »

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई

Pushpa 2 : सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ आता देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याच बरोबर आता या चित्रपटाने अनेक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले आहे. माहितीनुसार, पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली तर दुसर्‍या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात तब्बल129.5 कोटी रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. यामुळे 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे नुकतंच रिलीज झालेले ‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही. पुष्पा 2 ने सगळ्यात अगोदर देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई Read More »

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात. अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल

Marriage Viral Advertisements : आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच सोशल मीडियावर एका लग्नाची जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये 30 वर्षीय महिला आदर्श पती शोधत आहे. या महिलेला लग्नासाठी मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असावा आणि त्याच्याकडे किमान 28 एकरचे फार्महाऊस असावे, अशी मागणी 30 वर्षीय महिलेने केली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका 30 वर्षीय महिलेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या अजब जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे महिलेची मागणी?30 वर्षीय महिला लग्नासाठी आदर्श पती शोधत आहे. ज्यांचे वय 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. आणि तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असावा तसेच त्याच्याकडे चांगला आणि मजबूत व्यवसाय असणे आवश्यक आहे. मुलाकडे किमान 28 एकरचा बंगला किंवा फार्महाऊस असावा. मुलाला स्वयंपाक कसा करावा हे माहित असले पाहिजे. या पोस्टला 3,000 हून अधिक वेळा लाईक केले गेले आहे आणि 800 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहे.

Marriage Viral Advertisements: 28 एकर फार्महाऊस अन् एकुलता एक मुलगा लग्नासाठी पाहिजे, सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल Read More »

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Threat: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने बॉलीवूडमध्ये एकच खडबड उडाली आहे. तर पुन्हा एकदा सलमान खानला धमकी मिळाली आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स गेन्सकडून ही धमकी आल्याचा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीचा तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसांत सलमानला सहाव्यांदा धमकी मिळाली आहे. तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्याला ही धमकी देण्यात आली आहे. खरे तर हे गाणे लॉरेन्स आणि सलमानने एकत्र करून लिहिले आहे. हे गाणे लिहिणाऱ्याला महिनाभरात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे धमकीत म्हटले आहे. वृत्तानुसार, ‘गीतकार गाणे लिहू शकणार नाही’ अशी धमकी देण्यात आली होती. या मेसेजमध्ये सलमान खानला थेट आव्हान देण्यात आलं आहे. ‘सलमान खानकडे ताकद असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे’, असे म्हटले आहे. याआधी गुरुवारीच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्याच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांनंतर आता शाहरुखला धमक्या आल्या आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शाहरुख खानला धमकी देणारा कॉल वांद्रे पोलिस स्टेशनला आला आणि 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबरला सलमानला धमकीही मिळाली होतीसलमान खानला 4 नोव्हेंबरला आणखी एक धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला पकडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. व्यवसायाने वेल्डर असलेल्या या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली.

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी Read More »

Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Mooshak Aakhyan : वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या  चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  आणि मध्यवर्ती  भूमिकेची  धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद  यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. गौतमी पाटीलची लावणी ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे.   सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी  या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर देशमाने डिजी व्हिजन’द्वारे या चित्रपटाला प्रस्तुत करण्यात येत आहे. तर हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटासाठी लेखन केलं आहे. तर छाया दिग्दर्शन  सुरेश देशमाने यांचे आहे.हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे  यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर  तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे.‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया,अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्क चित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्क चित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित Read More »

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे?

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘पुकी’ सोबतचे फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Gues the Pookie’. तिचा पुकी कोण आहे, तिचा नवरा झहीर इक्बाल किंवा तिचा नवीन गोंडस पाळीव मित्र एक मजेदार कॅप्शनसह कोण आहे हे ठरवण्यासाठी अभिनेत्रीने हे तिच्या फॉलोवर्सवर सोडले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले – गर्भधारणेबद्दल अभिनंदन! मात्र, याला जोडप्याने दुजोरा दिलेला नाही.फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तर तिचा पती झहीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघे हसताना दिसत आहेत आणि सोनाक्षीने तिचे पिल्लू धरले आहे. सोनाक्षीच्या सुंदर फोटोंवर तिच्या पतीने किस आणि हार्ट इमोजी दिले आहेत. 7 वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये सलमान खान, संजय लीला भन्साळी, काजोल, तब्बू, यो यो हनी सिंगसह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. झहीर देखील एक अभिनेता आहे आणि त्याने 2019 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. झहीरचे वडील इक्बाल रतनसी दागिने आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आणि ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत. यामुळेच झहीरने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘नोटबुक’मधून सुरुवात केली. झहीरची बहीण सनम रतनसी ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलताना, अभिनेत्री तिच्या पतीसोबत ‘तू है मेरी किरण’ या आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करण्यास तयार आहे. याआधी सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे? Read More »